एक्स्प्लोर

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या

North Korea Ballistic missile: इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे सध्या संपूर्ण जगाचा जीव टांगणीला लागला आहे. अशातच उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सो़डल्या आहेत.

Kim Jong Un North Korea Ballistic missile: एकीकडे इराण विरुद्ध इस्रायल, अमेरिका यांच्यातील युद्ध शिगेला पोहोचले असताना आता युद्धासाठी कधीही एका पायावर तयार असणारे उत्तर कोरियाचे (North Korea) सर्वेसर्वा किम जोंग उन (Kim Jong Un) मैदानात उतरण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने युद्धाचा सराव सुरु केला आहे. उत्तर कोरियाच्या लष्कराने शनिवारी पूर्व समुद्रकिनाऱ्यावरुन 10 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे  (Ballistic missile)डागली आहेत. ही केवळ क्षेपणास्त्रांची चाचणी असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर कोरिया आणि जपानने 10 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दक्षिण कोरियाकडूनही उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात आल्याच्या वृत्ताबाबत भाष्य करण्यात आले आहे. उत्तर कोरियाने पूर्वे समुद्रकिनाऱ्यावरुन अज्ञात वस्तू प्रक्षेपित ( संभाव्य क्षेपणास्त्र चाचणी) केल्याचे दक्षिण कोरियाचे म्हणणे आहे. जपान या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. उत्तर कोरियाने सोडलेली क्षेपणास्त्रे समुद्रात पडल्याची माहिती जपानकडून देण्यात आली आहे. सध्या दक्षिण कोरियन लष्कराच्या वार्षिक सैन्य कवायती (फ्रीडम शिल्ड) सुरु आहेत. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात असलेल्या पूर्वापार संघर्षामुळे उत्तर कोरियाकडून दक्षिण कोरियाच्या या वार्षिक सैन्य कवायतींना विरोध केला जातो.  उत्तर कोरियाने शनिवारी अचानक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी का केली, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, प्रचंड मोठी लष्करी ताकद, आधुनिक युद्धसामुग्री आणि अणवस्त्रधारी असलेला उत्तर कोरिया या सगळ्या संघर्षात उतरल्यास हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरातील सर्व देश उत्तर कोरियाच्या हालचालींकडे लक्ष ठेऊन आहेत. 

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्षाचा आजचा 15 वा दिवस आहे. या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. खनिज तेलाचे दर प्रचंड वाढले आहेत. दरम्यान, इराण युद्धात माघार घेत नसल्याने आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये सैन्य घुसवण्याची तयारी सुरु केली आहे. अमेरिकेचे 2500 मरिन कमांडो आणि एक एम्फिबियस असॉल्ट शिप पश्चिम आशियाच्या दिशेने रवाना झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये अमेरिका इराणमध्ये एखादी मोठी लष्करी कारवाई करण्याची शक्यता आहे. उत्तर कोरियाने अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. अमेरिकेने उचललेले युद्धाचे पाऊल बेशरमपणाचे असल्याची भूमिका उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडली होती.

आणखी वाचा

अमेरिकेचा इराणवर सर्वात मोठा प्रहार; खनिज तेलाच्या निर्यातीचे केंद्र असलेल्या खर्ग आयलँडवरील लष्करी तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

महत्त्वाच्या बातम्या

Gen-Z Populations : Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget