(Source: ECI/ABP News/ABP Majha)
3 सेकंदांची क्लीप अन् तब्बल 10 कोटींचा दावा, नयनतारा-धनुष यांच्यात टोकाचा वाद, नेमकं प्रकरण काय आहे?
नयनतारा आणि धनुष यांच्यात तीन सेकंदांच्या एका क्लिपवरून वाद चालू आहे. हा वाद आता थेट कोर्टात पोहोचला आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
SUES Nayanthara: अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) ही गेल्या काही दिवसांपासून चांगीलच चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवर तिच्या लग्नाची एक डॉक्यूमेंटरी नुकतीच रिलीज झाली आहे. मात्र या व्हिडीओनंतर अभिनेता धनुषने नयनतारावर तीन सेकंदांच्या क्लिपसाठी तब्बल 10 कोटींचा दावा ठोकलाय. विशेष म्हणजे अवघ्या तीन सेकंदांच्या क्लिपसाठी धनुषने (Dhanush) नयनताराविरोधात थेट गुन्हा दाखल केलाय.धनुषच्या या भूमिकेनंतर नयनतारानेही थेट जाहीर पत्र लिहून धनुषवर गंभीर स्वरुपाची टीका केली. हे पत्र तिने सोशल मीडियावर पोस्टही केलं होतं. त्यानंतर आता हे प्रकरण नेमकं काय आहे? असं विचारलं जातंय.
नयनताराच्या डॉक्यूमेंटरीवर आक्षेप
मिळालेल्या माहितीनुसार धनुषने नयनतारा, नयनताराचा नवरा, फिल्ममेकर विग्नेश सिवन यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. द हिंदूच्या एका रिपोर्टनुसार धनुषच्या वंडरबार फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडने नयनतारा, विग्नेश आणि त्यांच्या राउडी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. या दाखल तक्रारीनुसार 'नयनतारा: बियॉन्ड द फेअरी टेल' या डॉक्यूमेंटरी मेकर्सने धनुष तसेच त्याच्या टीमची परवानगी न घेताच नानुम राउडी धान या चित्रपटातील एका सीनचा वापर केला आहे.
धनुषने मागितला 10 कोटी रुपये
नयनताराने या तक्रारीवर अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र धनुषच्या या निर्णयाबाबत तिने नाराजी मात्र व्यक्त केलेली आहे. तिने 16 नोव्हेंबर रोजी तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर धनुषसाठी एक ओपन लेटर पोस्ट केले होते. धनुष आतापर्यंत सर्वांत खालच्या स्तरावर पोहोचला आहे, असं नयनताराने या पत्रात म्हटलंय. तर धनुषने माझ्या चित्रपटातील 3 सेकंदांची क्लिप कोणतीही परवानगी न घेता वापरलेली आहे, असा आरोप करत 10 कोटी रुपयांची मागणी केली आहे.
3 सेकंदांची क्लिप हटवावी, अन्यथा...
नयनताराने धनुषला लिहिलेल्या ओपन लेटरमुळे मनोरंजन विश्वात चांगलीच खळबळ माजली होती. या पत्रानंतर धनुषच्या कायदेशीर टीमने नयनताराला नोटीस पाठवली होती. तसेच 24 तासांच्या आत तुम्ही ती 3 सेकंदांची ती क्लिप हटवावी, अशी मागणी केली होती. नयनताराने मात्र याला नकार दिला होता. त्यानंतर आता या प्रकरणात पुढे नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :