मोठी बातमी! पुष्पा चित्रपटातील मोठा अभिनेता वादाच्या भोवऱ्यात, महिलेकडून लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप; बॉलिवूडमध्ये खळबळ
पुष्पा चित्रपटात महत्त्वाची भूमिका करणाऱ्या मोठ्या अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. या आरोपानंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.
Case Filed Against Shri Tej : अभिनेता अल्लू अर्जून आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेल्या पुष्पा-2 या चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा आहे. या चित्रपटाने प्रदर्शित होण्याआधीच कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटातील गीत, अल्लू अर्जून आणि रश्मिकाच्या अभिनयाचीही जोरदार चर्चा चालू आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच तेलुगु तसेच बॉलिवूड चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र आता याच चित्रपटात काम करणारा आणि महत्त्वाची भूमिका साकारणारा श्रीतेज हा अभिनेता आता अडचणीत सापडला आहे. त्याच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
अल्लू अर्जुनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पुष्पा: द राइज’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात श्री तेज याने अल्लू अर्जुनच्या भावाची भूमिका साकारली आहे. श्रीतेजवर लग्नाचे अमिष दाखवून आर्थिक, भावनिक तसेच शारीरिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. या महिलेने याबाबत हैदराबात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तपत्राच्या एका रिपोर्टनुसार 25 नोव्हेंबर 2024 रोजी कुकटपल्ली पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. या तक्रारीत श्रीतेजने मला फसवले आहे. श्रीतेजने माझ्याश लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याने माझे 20 लाक रुपये घेतले आहेत. माझं आर्थिक शोषण झालेलं आहे, असं या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. तसेच माझ्यासोबत रिलेशनमध्ये राहूनही त्याचे आणखी एका महिलेशी संबंध होते. या महिलेपासून श्रीतेजला सात वर्षांचे मूलही आहे, असा खळबळजनक आरोप या महिलेने केला आहे.
याआधीही महिलेने दिली होती तक्रार
या महिलेने एप्रिल महिन्यात अशीच एक तक्रार दिली होती. मात्र श्रीतेजच्या कुटुंबीयांनी योग्य ते पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे ही तक्रार महिलेने वापस घेतली होती. माधापूर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. दाखल तक्रारीनंतर आथा पोलिसांनी आपला तपास चालू केला आहे.
कोणकोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल
दाखल तक्रारीनुसार श्रीतेजवर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बीएनएस 69, 115(2), आणि 318(2) यासह इतरही कलमांखाली श्रीतेजवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीतेज पहिल्यांदाच अशा प्रकारे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नाही. याआधीही त्याच्यावर एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ व्हाईस प्रेसिडेंट सुरेश यांची पत्नी अर्चना यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्याप्रकरणी चर्चेत आला होता.
अनेक चित्रपटांत केली आहे भूमिका
दरम्यान, श्रीतेजने आतापर्यंत पुष्पा, वंगावेती, धमाका, मगलावरम, बहिष्करण यासारख्या प्रसिद्ध तेलुगु चित्रपटांत भूमिका केलेली आहे. त्याचे तेलुगु चित्रपटसृष्टीत मोठे नाव आहे. मात्र अशा प्रकारे वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे त्याच्या प्रतिमेलाही काही प्रमाणात तडा गेलेला आहे.
हेही वाचा :