Amol Palekar : कोरोनाची लागण, अभिनेते अमोल पालेकर पुण्यातील रुग्णालयात दाखल
Amol Palekar : 70 आणि 80 च्या दशकातील अभिनेते अमोल पालेकर यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Amol Palekar : सुप्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांना कोरोनामुळे 30 जानेवारी रोजी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा बरी असल्याचे सांगण्यात येत आहे. अमोल पालेकर यांना कोरोनाची तीव्र लक्षणे असून, तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती एबीपी न्यूजला एका सूत्राद्वारे मिळाली आहे.
रूग्णालयात दाखल केले तेव्हा अमोल पालेकर यांची प्रकृती फारच खालावली होती आणि सुरुवातीला त्यांना व्हेंटिलेटरवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल केल्यानंतर 10 दिवसांनंतर अमोल पालेकर यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा स्थिर आणि चांगली आहे. अशा परिस्थितीत त्यांना व्हेंटिलेटरवरून काढून आता सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे.
अमोल पालेकर यांच्या पत्नी संध्या गोखले एबीपी न्यूजला माहिती देत म्हणाल्या," अमोल पालेकर यांच्या प्रकृतीबाबत काळजी करण्यासारखे काही नाही. अतिधूम्रपानामुळे 10 वर्षांपूर्वीदेखील त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे".
70 आणि 80 च्या दशकात अमोल पालेकर यांनी रजनीगंधा, छोटी सी बात, नरम गरम, गोलमाल, चितचोर, भूमिका, श्रीमान श्रीमती, अनकही, रंग-बिरंगी, घरोंदा, सावन, बातों बातों में यांसारख्या अनेक हिंदी सिनेमांत काम केले आहे. त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अमोल पालेकर यांनी 'बाजीरावचा बेटा' आणि 'शांतता! कोर्ट चालू आहे' या सिनेमांच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. सिनेमांसह त्यांनी अनेक दर्जेदार नाटकांतही काम केले. तसेच शाहरुख खान आणि राणी मुखर्जीच्या 'पहेली' या सिनेमाचे दिग्दर्शनदेखील अमोल पालेकर यांनी केले आहे.
अमोल पालेकर यांनी हिंदीप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीतही खूप काम केले आहे. त्यांनी मराठीतील अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. विनोदी चित्रपटांबरोबरच अनेक चित्रपटांतून त्यांनी गंभीर भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारल्या आहेत. बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल पालेकर हे अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी बँक ऑफ इंडियामध्ये क्लार्क होते. ते एक उत्तम चित्रकारही आहेत.
संबंधित बातम्या
Yami Gautam : 'A Thursday' सिनेमाचा टीझर आऊट, यामी गौतमचा अनोखा अंदाज
Rashmika Mandanna : थिएटरमध्ये बसून रश्मिका मंदान्ना शिट्टी वाजवते तेव्हा...
कौतुकास्पद! सोनू सूदनं अपघातात जखमी झालेल्या तरूणाची केली मदत, मोठा अनर्थ टळला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha