Bobby Deol : 'अब नई दुनिया बनाऊंगा'; बॉबी देओलच्या 'आश्रम 3' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
आश्रम (Aashram) या सीरिजच्या दोन भागांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
Bobby Deol : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओलचा (Bobby Deol) चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. बॉबीच्या आश्रम (Aashram 3) या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर या सीरिजचे दोन सिझन रिलीज जाले. सीरिजच्या दोन्ही सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता आश्रम या सीरिजचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता या तिसऱ्या सिझनमधून बाबा निराला पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
ट्रेलरमध्ये बाबा निरालाचा जयघोष करताना काही लोक दिसत आहेत. तसेच अभिनेत्री ईशा गुप्ताचा ग्लॅमरस अंदाजही या ट्रेलरमध्ये दिसत आहे. 3 जून रोजी आश्रम -3 ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बॉबी देओलचे चाहते या सीरिजची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. मॅक्स प्लेयरवर ही सीरिज रिलीज होणार आहे.
बॉबीनं शेअर केला होता मोशन पोस्टर
काही दिवसांपूर्वी बॉबीनं या सीरिजचा मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला होता. या पोस्टरमध्ये तीन लिहिलेलं दिसत आहे. बॉबी देओलसोबतच ईशा गुप्तानं देखील हा मोशन पोस्टर तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. मोशन पोस्टरसोबत सीरिजच्या रिलीज डेटची कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. आश्रम या सीरिजच्या पहिल्या दोन सिझनमध्ये अभिनेता बॉबी देओलनं बाबा निराला ही भूमिका साकारली आहे. काशीपूर येथील एका काल्पनिक कथेवर या सीरिजचं कथानक आधारित आहे.
ड्रग्स, गुंड आणि राजकारण या सर्व गोष्टींवर आधारित असलेल्या आश्रम सीरिजच्या तिसऱ्या सिझनमध्ये नक्की काय दाखवले जाईल? याबाबत सध्या प्रेक्षक विचार करत आहेत. त्रिधा चौधरी, अदिती सुधीर पोहनकर आणि तुषार पांडे यांनी आश्रम सीरिजमध्ये काम केलं आहे.
बॉबी हा बादल, बिच्छू, सोल्जर, हमराज आणि अजनबी या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. काही दिवसांपूर्वी लव्ह हॉस्टेल हा बॉबी देओलचा चित्रपट रिलीज झाला.
हेही वाचा :
- Superhit Bollywood Stars : दीपिका पदुकोण ते शाहरुख खान, ‘या’ कलाकारांना पहिल्याच चित्रपटाने रातोरात बनवले स्टार!
- Chhavi Mittal Post : कॅन्सरच्या ऑपरेशननंतर पहिल्यांदाच छवी जिममध्ये, फोटो शेअर करत म्हणाली...
- Dharmaveer : सोशल मीडियावरही दिसतेय ‘धर्मवीर’ची क्रेझ! अवघ्या 24 तासांत ट्रेलरला लाखो व्ह्यूज!