(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aarya 2 Trailer : 'आर्या-2' चा ट्रेलर प्रदर्शित; लेडी डॉनच्या भूमिकेत सुष्मिता सेन, दमदार लूक चर्चेत
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची नेहमी मनं जिंकत असते. सुष्मिता सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते.
Sushmita Sen Aarya 2 trailer: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची नेहमी मनं जिंकत असते. सुष्मिता सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिच्या नव्या चित्रपटांबद्दल आणि वेब सीरिजबद्दल ती सोशल मीडियावर चाहत्यांना माहिती देते. नुकताच सुष्मिताच्या 'आर्या-2' (Aarya 2) या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधील सुष्मिताच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
आर्या या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये असे दाखण्यात आले होते की, आर्या ही पतीच्या हत्येनंतर ती मुलांसह देश सोडून जाण्याच्या तयारीत आहे. दुस-या सीझनच्या ट्रेलरमध्ये आर्या परत आल्याचं पाहायला मिळतंय. आर्या या सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. पहिल्या सीझनमध्ये सुष्मितासोबतच चंद्रचूर सिंह, नमित दास, अंकुर भाटिया आणि विकास कुमार या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या सीरिजचे दिग्दर्शन हे राम माधवानी, संदीप मोदी आणि विनोद रावत यांनी केले होते. सीरिजच्या पहिल्या सीझनमधील सुष्मिताच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होते. आर्या वेब सीरिजचा दुसरा सीझन 10 डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे.
काही दिवसांपूर्वी सुष्मिताने 'आर्या-2' सीरिजमधील मधील तिच्या लूकचा व्हिडीओ शेअर केला होता. लूक शेअर करून सुष्मिताने त्याला , 'शेरनी इज बॅक' असं कॅप्शन दिले होते. सुष्मिताने शेअर केलेल्या लूकमध्ये ती लाल रंगामध्ये रंगलेली दिसली. आर्याच्या पहिल्या सीझनला इंटरनेशनल एमी अवार्ड्स 2021 चे नोमिनेशन मिळाले होते. आता आर्या-2 चा ट्रेलर पाहून सुष्मिताचे चाहते या सीरिजची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
Sushmita Sen Arya 2 first look : 'शेरनी इज बॅक'; सुष्मिता सेनने शेअर केला 'आर्या-2' चा फर्स्ट लूक