The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’वर आमिर खानची प्रतिक्रिया, म्हणाला ‘प्रत्येक भारतीयाने...’
Aamir Khan : ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट अनेक वादात अडकला होता. आता या चित्रपटाबाबत बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची (Aamir Khan) प्रतिक्रिया समोर आली आहे.
Aamir Khan : बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांचा 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या या चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला आहे. कश्मीर फाइल्स एक हृदय पिळवटून टाकणारी कथा आहे. या चित्रपटाला जगभरातून खूप पसंती दिली जात आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट लवकरच 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.
‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट अनेक वादातही अडकला होता. आता या चित्रपटाबाबत बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची (Aamir Khan) प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने चित्रपटाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.
प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवावा!
वादांच्या भोवऱ्यात अडकूनही या चित्रपटाला लोकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यात आमिर खानचाही समावेश आहे. काश्मिरी पंडितांच्या वेदना देशाने जाणून घेतल्या पाहिजेत, असे आमिर खानने म्हटले आहे. ‘काश्मिरी पंडितांचे हाल पाहून मन व्यथित झाले आहे. एक चित्रपट जो अशा संवेदनशील विषयावर बनला आहे, तो नक्कीच प्रत्येक भारतीयाने पाहावा आणि प्रत्येक भारतीयाने तो लक्षात ठेवावा’, असे आमिर म्हणाला. आमिर पुढे म्हणाला की, ‘मी हा चित्रपट नक्कीच पाहीन आणि चित्रपटाचे यश पाहून मला खूप आनंद झाला आहे.’
लवकरच गाठणार 200 कोटींचा टप्पा!
आत्तापर्यंत ‘द कश्मीर फाइल्स’ने भारतात 141 कोटींचा व्यवसाय केला आहे. पहिल्या आठवड्यात हा चित्रपट केवळ 630 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. परंतु, आता तो सुमारे 4000 स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे. तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्येही हा चित्रपट डब केला जात आहे. आकडेवारीनुसार, चित्रपट लवकरच 200 कोटींचा आकडा गाठू शकतो. मात्र, या चित्रपटाचा वाद काही कमी झालेला नाही.
अलीकडेच कश्मीर फाइल्सच्या टीमने योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेतली. त्यानंतर योगींनी चित्रपटाच्या टीमसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
‘द कश्मीर फाइल्स’चे पंतप्रधान मोदींसह अनेक भाजप नेत्यांनी कौतुक केले आहे. आठ राज्यांमध्ये चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. काश्मिरी पंडितांच्या वेदनेवर बनलेला हा चित्रपट, बिग बजेट स्टार्सशिवाय, गाण्यांशिवाय देखील चांगला गल्ला जमवत आहे. अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे.
हेही वाचा :
- 'द कश्मीर फाइल्समध्ये अनेक गोष्टी असत्य, पण..'. संजय राऊत थेटच बोलले
- World Tv Premiere : 'पुष्पा- द राइज' आणि '83'चा आज होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' ला गर्दी कोणाची? भाजपची की सामान्य प्रेक्षकांची?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha