World Tv Premiere : 'पुष्पा- द राइज' आणि '83'चा आज होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर
World Tv Premiere : 'पुष्पा- द राइज' आणि '83' सिनेमाचा आज वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे.
World Tv Premiere : 2021 मध्ये 'पुष्पा- द राइज' आणि '83' हे बिग बजेट सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित झाले. या दोन्ही सिनेमांनी सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'पुष्पा- द राइज' आणि '83' सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे.
'पुष्पा- द राइज' आणि '83' हे दोन्ही सिनेमे सिनेमागृहात आमने-सामने होते. बॉक्स ऑफिसवर या दोन्ही सिनेमांत चुरशीची स्पर्धा होती. 'पुष्पा- द राइज' सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत होता. तर '83' सिनेमात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत होता.
View this post on Instagram
'पुष्पा: द राइज' या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर आज ढिंचॅक चॅनलवर रात्री आठ वाजता होणार आहे. तर रात्री आठ वाजताच रणवीर सिंहच्या '83' सिनेमाचा स्टार गोल्डवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे.
'पुष्पा: द राइज' हा सिनेमा प्रेक्षक अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत पाहु शकतात. तर रणवीर सिंहचा '83' सिनेमा लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या
'द कश्मीर फाइल्समध्ये अनेक गोष्टी असत्य, पण..'. संजय राऊत थेटच बोलले
Bhavana Menon : पाच वर्षांपूर्वी अत्याचाराला बळी, आता केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी
पत्नीसोबत बॉईज हॉस्टेलमध्ये राहायचे पंकज त्रिपाठी, वॉर्डनला कळलं तेव्हा...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha