एक्स्प्लोर

अमोल पालेकर, रिंकू राजगुरू आणि उपेंद्र लिमये यांचा '200 - हल्ला हो' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सार्थक दासगुप्ता दिग्दर्शित, चित्रपटामध्ये, अमोल पालेकर, रिंकू राजगुरू आणि उपेंद्र लिमये, वरूण सोबती, साहील खत्तर, सलोनी बत्रा आणि इंद्रनील सेनगुप्ता यांच्या भूमिका आहेत.

मुंबई : zee5 च्या '200 - हल्ला हो' (200 Halla Ho) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून, प्रेक्षकांची उत्कंठा फारच वाढली आहे. कारणही तसेच आहे, ते म्हणजे अमोल पालेकर यांचे बऱ्याच काळानंतर पडद्यावर झालेले पुनरागमन, सत्यघटनेवर प्रेरित दमदार कथानक.

सार्थकी दासगुप्ता दिग्दर्शित, '200-हल्ला हो' ही गोष्ट आहे, 200 दलित स्त्रियांची ज्यांनी एकत्र येऊन गुंडगिरी करणाऱ्या टोळी, लुटेरे आणि बलात्काऱ्यांविरुद्ध  कोर्टामध्येच कायदा आणि न्याय स्वतःच्या हातात घेतला. ट्रेलरमध्ये कलाकारांनी साकारलेल्या दमदार भूमिकेची झलक दिसते. सत्य घटनेवर आधारित या कथेमध्ये स्त्रियांना न्याय मिळवण्यासाठी, कोणत्याही परिस्थितीमध्ये हा लढा लढण्याची ताकद मिळाली आणि निर्णय घेतला याचे अतिशय सुरेख चित्रण केले आहे.

अमोल पालेकर, रिंकू राजगुरू आणि उपेंद्र लिमये यांचा '200 - हल्ला हो' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

या चित्रपटामध्ये, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, सैराट फेम रिंकू राजगुरू आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते उपेंद्र लिमये अशी तगडी स्टार कास्ट असून हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे.

अमोल पालेकर म्हणतात, "मला कथेमधील जाती व्यवस्थेवर भाष्य करणारा धागा आवडला. जो भारतीय चित्रपटांमध्ये आधी फार दिसायचा नाही. तसेच, जातीच्या दडपशाहीला बळी पडलेल्या स्त्रियांनी न डगमगता केलेला संघर्ष, हे तथ्य फार आवडले. जातीयवाद आणि पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध ऍस्ट्रोसिटीसाठी  आवाज उठवणाऱ्या या स्त्रियांना हे एक अभिवादन आहे. चित्रपट सत्यघटनेवर आधारित असल्यामुळे मला काम करायला अधिक छान वाटले. माझे रिटायर्ड दलित न्यायाधीशाचे पात्र आम्ही सखोल चर्चा करून रंगवल्यामुळे त्याला अनेक कंगोरे आहेत.

रिंकू राजगुरू म्हणते, "ही कथा सत्यघटनेवर आधारित असल्यामुळे, मला माझे पात्र हे स्त्रियांनी मिळवलेल्या न्यायाबद्दल जागरूकता पसरवण्याची संधी आहे, असे वाटले. स्वतःसाठी आणि इतरांसाठी बोलणे किती महत्त्वाचे आहे हे देखील या कथेतून आपल्याला कळते. सार्थक सरांनी (चित्रपटाचे दिग्दर्शक) जेव्हा पहिल्यांदा मला ही कथा ऐकवली तेव्हाच मला कथेतील वास्तवाने हलवून टाकले. दलित स्त्रिया कशा रोज भरडल्या जातात, पण त्याविरुद्ध कोणीही आवाज उठवत नाही, याचे मला फार वाईट वाटले. माझं रक्त अक्षरशः खवळले होते! म्हणूनच मी हे पात्र साकारणार आहे, जे स्वतःसाठी आणि इतरांसाठी आवाज उठवते."

सार्थक दासगुप्ता लिखित आणि दिग्दर्शित, योडली फिल्म्सद्वारे निर्मित, सारेगामा द्वारे प्रदर्शित चित्रपट "200- हल्ला हो" पाहायला विसरू नका 20 ऑगस्टपासून फक्त zee5 वर

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget