एक्स्प्लोर

आम्ही हरलो तरीही पराभव मान्य नाही, तळकोकणात सेनेचा उमेदवार निवडून येणं संशयास्पद, नारायण राणेंचा सवाल

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सर्व फेऱ्यांमध्ये 7000 ते 8000 मतांचा फरक कसा दाखवतो असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांचा ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर राणेंनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या निकालावरचं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. तळकोकणात आम्ही हरलो असलो तरीही पराभव मान्य नसल्यांची मतं नारायण राणे वक्त केलं आहे. तसेच कोकणात सेनेचा उमेदवार निवडुन येण संशयास्पद असल्याचंही राणे म्हणाले. कालचा निकाल म्हणजे हेराफेरी असून निकालावर संशयाला जागा निर्माण होत असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सर्व फेऱ्यांमध्ये 7000 ते 8000 मतांचा फरक कसा दाखवतो असा सवालही उपस्थित केला. तसेच कणकवलीत आमच्या उमेदवाराच्याच मतदारसंघात आम्हाला लीड नाही हेचं संशयास्पद असल्याचं राणे म्हणाले. या निकालावर निवडणूक आयोगाकडे तक्रार विचार करायचा की नाही यावर विचार करुन निर्णय घेणार असल्याचे राणेंनी सांगितले. VIDEO | सेना, भाजप, काँग्रेससह सगळ्यांचा हिशेब होणार, आत्मचरित्रावर नारायण राणेंची प्रतिक्रिया | एबीपी माझा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांचा ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. या पराभवामुळे कोकणात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना बसलेला मोठा धक्का आहे. नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत निलेश राणे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं. राणेंच्या राजकीय अस्तित्त्वासाठी देखील ही निवडणूक महत्त्वाची होती. मात्र दुसऱ्यांदा पराभवामुळे नारायण राणेंची पुढील राजकीय कारकीर्द कशी असणार, त्यांच्या पराभवाची कारणं काय, यावर आता चर्चा सुरु झाली आहे. Narayan Rane | काय सांगतात नारायण राणेंचे ग्रहतारे? | ग्रहताऱ्यांच्या गल्लीतून दिल्ली | ABP Majha संबंधित बातम्या तळकोकणात नारायण राणेंना धक्का, बालेकिल्लाही त्यांचा राहिला नसल्याची चर्चा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Embed widget