एक्स्प्लोर

Elections 2022: यूपी, उत्तराखंडसह गोव्यात सत्ता टिकवण्याचे भाजपसमोर आव्हान, पाहा कोणत्या राज्यात काय परिस्थिती?

उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर गोवा आणि उत्तराखंडमधील सर्वच जागांसाठी आज मतदान होणार आहे. या मतदानाच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Elections 2022 : आज उत्तर प्रदेशसह गोवा आणि उत्तराखंडमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर गोवा आणि उत्तराखंडमधील सर्वच जागांसाठी आज मतदान होणार आहे. या मतदानाच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक बड्या राजकीय नेत्यांचे भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. त्यामुळे मतादानासाठी सर्वच पक्षांमध्ये चुरच पाहायला मिळणार आहे. नेमकी कोणत्या राज्यात काय परिस्थिती ते पाहुयात....

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशमध्ये एकूण विधानसभेच्या 403 जागा आहेत. यामध्ये 58 जांगाचा पहिला टप्पा 10 फेब्रुवारीला उत्तर प्रदेशमध्ये पार पडला होता. त्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांसाठी मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांपैकी 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 38 जागांवर विजय मिळवला होता. तर समाजवादी पार्टीला 2017 मध्ये 15 जागा मिळाल्या होत्या. त्याचबरोबर काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. सपा आणि काँग्रेसने गेली विधानसभा निवडणूक एकत्र लढवली होती. सपाने जिंकलेल्या 15 जागांपैकी 10 जागांवर मुस्लिम उमेदवार विजयी झाले होते.

उत्तराखंडमध्ये सत्ता टिकवण्याचे भाजपसमोर आव्हान

उत्तराखंडमध्ये  विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदानाची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोरोना नियमांचे पालन करुन मतदान प्रक्रिय पार पडणार आहे. एक तास उशीरा म्हणजे 8 वाजता उत्तराखंडमध्ये मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे. उत्तराखंडमध्ये 2017 चा विचार केला तर भाजपला 57 जागा मिळाल्या होत्या. तर 11 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता. दोन जागांवर अपक्षानी बाजी मारली होती. त्यामुळे यावेळेला उत्तराखंडमध्ये भाजपसमोर सत्ता राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

उत्तराखंडमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

या निवडणुकीत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी सतपाल महाराज, सुबोध उनियाल, अरविंद पांडे, धनसिंग रावत आणि रेखा आर्य यांच्याशिवाय भाजपच्या उत्तराखंड युनिटचे अध्यक्ष मदन कौशिक हे महत्त्वाचे उमेदवार आहेत. त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांचे राजकीय भविष्य आत मतेटीत बंद होणार आहे. तर काँग्रेसच्या प्रमुख उमेदवारांमध्ये माजी मुख्यमंत्री हरीश रावत, माजी मंत्री यशपाल आर्य, काँग्रेसच्या उत्तराखंड युनिटचे अध्यक्ष गणेश गोदियाल आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रीतम सिंह यांचा प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

गोव्यात काय स्थिती

गोव्यामध्ये विधानसभेच्या सर्व 40 जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. 40 जागांसाठी एकूण सर्व पक्षांते मिळून 301 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्वांचे भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत 40 पैकी 17 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, लुईझींनो फलेरो आणि दिगंबर कामत यांच्या मुख्यमंत्री पदावरून झालेल्या अंतर्गत वादात भाजपाने आपल्या 13 आमदारसह महाराष्ट्र गोमंतक पक्ष 3 आमदार, गोवा फॉरवर्ड 3 आमदार व 2 अपक्ष आमदारांच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली. तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर काँग्रेसकडून विजयी झालेले विश्वजित राणे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपची एक जागा वाढली परिणामी काँग्रेसची एक जागा कमी झाली.

गोव्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

गोव्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत (भाजप), विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (काँग्रेस), माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाओ (टीएमसी), रवी नाईक (भाजप), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई (अपक्ष) यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर आणि AAP चे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अमित पालेकर. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची युतीदेखील  गोव्यात निवडणूक लढवत आहे. त्याचबरोबर आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दरम्यान, गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. तर उत्तराखंडमध्ये आठ वाजता मतदानाला सुरूवात होणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.  

 महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
गेल्यावर्षी भारतात आले, पीएम मोदींसोबत शेकहँड देत फोटोसेशन अन् आता कॅनडातील त्यांच्याच पक्षाने थेटं तिकिट कापलं!
गेल्यावर्षी भारतात आले, पीएम मोदींसोबत शेकहँड देत फोटोसेशन अन् आता कॅनडातील त्यांच्याच पक्षाने थेटं तिकिट कापलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 12 PM Top Headlines 12 PM 27 March 2025 दुपारी 12 च्या हेडलाईन्सPrashant Koratkar : Indrajeet Sawant यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरची कबुली : सूत्रAnjali Damania : Sudarshan Ghule ला टोळीचा म्होरक्य का दाखवलं जातंय,अंजली दमानियांचा सवालTop 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 27 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
गेल्यावर्षी भारतात आले, पीएम मोदींसोबत शेकहँड देत फोटोसेशन अन् आता कॅनडातील त्यांच्याच पक्षाने थेटं तिकिट कापलं!
गेल्यावर्षी भारतात आले, पीएम मोदींसोबत शेकहँड देत फोटोसेशन अन् आता कॅनडातील त्यांच्याच पक्षाने थेटं तिकिट कापलं!
मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य
मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य
चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
बकऱ्याचं मुंडकं रंगीत दोरीने उंबरठ्यावर लटकवलं, दार उघडताच सुया टोचलेले 21 लिंबू दिसले; सांगलीत जादूटोण्यामुळे लोक भयभीत
बकऱ्याचं मुंडकं रंगीत दोरीने उंबरठ्यावर लटकवलं, दार उघडताच सुया टोचलेले 21 लिंबू दिसले; सांगलीत जादूटोण्यामुळे लोक भयभीत
Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
Embed widget