(Source: ECI/ABP News/ABP Majha)
UP Election 2022 : 114 उमेदवारांचं फक्त आठवीपर्यंतच शिक्षण, 'इतके' नेते आहेत निरक्षर
UP Election 2022 : उत्तर प्रदेश निवडणुकीत 12 नेते 'अशिक्षित' आहेत, 67 'साक्षर' आहेत,
UP Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी 114 जणांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तर 12 जणांनी स्वतःला 'अशिक्षित' म्हणून घोषित केले आहे. उत्तर प्रदेश इलेक्शन वॉच अँड असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR), निवडणूक सुधारणांसाठी वकिली करणाऱ्या गटांच्या अहवालात म्हटले आहे की, 102 उमेदवार पदव्युत्तर आहेत तर सहा उमेदवार पीएचडी करत आहेत.
पश्चिम उत्तर प्रदेशातील अमरोहा, बरेली, बिजनौर, बदाऊन, मुरादाबाद, रामपूर, सहारनपूर, संभल आणि शाहजहानपूर या नऊ जिल्ह्यांतील विधानसभेच्या 55 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. हा अहवाल दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक लढविणाऱ्या 586 उमेदवारांपैकी 584 उमेदवारांच्या स्व-प्रतिज्ञापत्रांच्या विश्लेषणावर आधारित आहे. अहवालात म्हटले आहे की, दोन उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले जाऊ शकत नाही कारण ते एकतर योग्यरित्या स्कॅन केलेले नाहीत किंवा ते अपूर्ण आहेत.
88 उमेदवार बारावी उत्तीर्ण झाले
विश्लेषणानुसार,12 नेते 'अशिक्षित' आहेत, 67 'साक्षर' आहेत,12 उमेदवार पाचवी उत्तीर्ण आहेत आणि 35 उमेदवार आठवी उत्तीर्ण आहेत, तर 58 उमेदवार दहावी आणि 88 उमेदवार 12वी उत्तीर्ण आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक 14 फेब्रुवारीला होणार
यूपीसह पाच राज्यांमध्ये विधानसभा होत आहेत. यूपीमध्ये 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यासाठी मतदान झाले आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठी 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. यूपीमध्ये, 14 फेब्रुवारी रोजी सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बुदौन, बरेली आणि शाहजहानपूर या नऊ जिल्ह्यांतील 55 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. याशिवाय उत्तराखंडमधील 70 आणि गोव्यातील 40 जागांवर एकाच दिवशी मतदान होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- UP Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात 58 टक्के मतदान, 623 जणांचं भवितव्य मतदान पेटीत बंद
- Assembly Election : निवडणूक आयोगाकडून प्रचार निर्बंधांमध्ये सूट; नव्या गाईडलाईन्स जारी
- Assam congress : मुख्यमंत्री हिंमत बिस्वा यांच्याविरोधात काँग्रेस आक्रमक, आज एनएसयूआयचे आसाम भवनासमोर आंदोलन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha