एक्स्प्लोर

UP Election 2022: सावधान! रात्र वैऱ्याची आहे.... EVM मध्ये फेरफार होऊ नये म्हणून स्ट्राँग रुमला कार्यकत्यांचे 'सुरक्षा कडं'

UP Election 2022: भाजप वगळता इतर सर्वच पक्षाच्या कार्यकत्यांनी EVM मशिनमध्ये फेरफार होऊ नये म्हणून मतमोजणी केंद्राला सुरक्षा कवच दिलं आहे.

UP Election 2022: उत्तर प्रदेशची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्वाची असून अनेक लढती या चुरशीने होण्याची शक्यता आहे. अशावेळी ईव्हीएम मशिनमध्ये काही गडबड वा फेरफार होऊ नये म्हणून भाजप वगळता सर्वच पक्षांनी खबरदारी घेतली आहे. उत्तर प्रदेशातील मतमोजणी केंद्रांना कार्यकर्त्यांनी सुरक्षा कवच प्रदान केलं असून या ठिकाणी 24 तास पहारा दिला जात आहे. 

स्ट्रॉंग रूमला भाजपा वगळता इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांचं सुरक्षाकवच असल्याचं चित्र उत्तर प्रदेशमध्ये दिसून येतंय. मतमोजणी केंद्रावर कार्यकर्ते 24 तास ठाण मांडून बसले आहेत. कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या शिफ्ट करून दिल्या जात आहेत. कुठली एखादी गाडी गेली किंवा इतर साहित्य आलं तर त्याची चौकशी हे कार्यकर्ते करताना दिसत आहेत. ईव्हीएममध्ये गडबड होण्याच्या भीतीने हे सुरक्षाकवच दिलं जातंय . या कार्यकर्त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था संबंधित पक्षाकडून केली जात आहे. 

गेल्यावेळच्या विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार केल्याचा आरोप सर्व विरोधी पक्षांनी केला होता. त्यातच मतदान झाल्यानंतर अनेक ईव्हीएम मशिन भाजप नेत्यांच्या खासगी गाड्यांमध्ये आढळल्याचा आरोपही अनेकदा करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता ईव्हीएम मशिनमध्ये काही फेरफार होऊ नये म्हणून भाजप वगळता सर्व पक्षांनी कंबर कसली आहे.  

मॅजिक फिगर 202
देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागा आहेत. या 403 जागांसाठी उत्तर प्रदेशमध्ये एकूण सात टप्प्यात मतदान झाले होते. येथे बहुमत मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला 202 जागा जिंकाव्या लागतील. जो पक्ष 202 जागा जिंकेल तो पक्ष उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करणार आहे.

एक्झिट पोल काय सांगतोय? 
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच बाजी मारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. समाजवादीच्या अखिलेश यादव यांनी मोदी-योगींना जबरदस्त टक्कर दिली असली तरी भाजप आपली सत्ता कायम राखणार असल्याचं या पोलमधून स्पष्ट झालं आहे. एक्झिट पोलनुसार भाजप 228 ते 244 तर समाजवादी पक्ष 132 ते 148 जागा जिंकण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Bhosale Khokya Bhai : खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
Maharashtra Budget 2025 : अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
BMC : कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4 PM 10 March 2025Eknath Shinde - Uddhav Thackeray पहिल्यांदाच समोरासमोर, एकमेकांकडे पाहिलंही नाहीAjit Pawar On Ladki Bahin : 2025-26 मध्ये लाडकी बहिण योजनेसाठी 36 हजार कोटींची तरतूद : अजित पवारABP Majha Marathi News Headlines 02.00 PM TOP Headlines 02.00 PM 10 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Bhosale Khokya Bhai : खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
Maharashtra Budget 2025 : अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
BMC : कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Raj Thackeray : राज ठाकरेंनी ज्या आमदाराला राजकारणात उभं केलं, त्यानेच आता मनसेप्रमुखांना सुनावलं; कुंभमेळ्याच्या वक्तव्यावरुन पलटवार
राज ठाकरेंनी ज्या आमदाराला राजकारणात उभं केलं, त्यानेच आता मनसेप्रमुखांना सुनावलं; कुंभमेळ्याच्या वक्तव्यावरुन पलटवार
जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, काय आहे नियम?
जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, काय आहे नियम?
Maharashtra Budget 2025 : कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद; अजितदादांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय?
कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद; अजितदादांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय?
'या' कारणांनी थंडगार फ्रीजमध्ये होऊ शकतो 'स्फोट'
'या' कारणांनी थंडगार फ्रीजमध्ये होऊ शकतो 'स्फोट'
Embed widget