UP Election Campaigning : यूपीमध्ये तिसऱ्या टप्प्यातील 59 जागांसाठी उद्या मतदान, 2 कोटी 15 लाख मतदार बजावणार हक्क
त्तर प्रदशमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया उद्या (20 फेब्रुवारी) पार पडणार आहे. यासाठी सुरू असलेला प्रचार काल रात्री थांबला.
UP Election Campaigning : सध्या उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. दरम्यान, उत्तर प्रदशमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया उद्या (20 फेब्रुवारी) पार पडणार आहे. यासाठी सुरू असलेला प्रचार काल रात्री थांबला. तिसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 59 जागांसाठी मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बड्या नेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतल्या. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
तिसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 16 जिल्ह्यातील 59 जागांसाठी मतदन होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 2 कोटी 15 लाख 75 हजार 430 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 1 कोटी 16 लाख 12 हजार 010 पुरुष मतादर तर 99 लाख 62 हजार 324 महिला मतदारांचा समावेश आहे. 59 जागांसाठी तब्बल र्व पक्षांचे मिळून 627 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये 531 पुरुष उमेदवार तर 96 महिला उमेदवारांचा समावेश आहे.
तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला असतानाच चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज रात्री आठ वाजता भाजपच्या मुख्यालयात महत्त्वाची बैठक होणार आहे. ज्यामध्ये अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासह उत्तर प्रदेशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पुढील 4 टप्प्यातील निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे बांदा, रायबरेली आणि लखनौला भेट देणार आहेत. तिथे ते अनेक जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. यानंतर ते संध्याकाळी लखनौमध्ये भाजपच्या मोठ्या सभेला उपस्थित राहणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: