एक्स्प्लोर

ठाकरेंची तोफ धडाडणार, 5 नोव्हेंबरपासून सुरुवात, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही सभा

शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा प्रचारसभांसाठीचा नियोजित दौरा आखण्यात आला असून  5 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर असा दौरा आहे

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपुष्टात आल्याने आता सर्वांनाच विधानसभेच्या प्रचाराचे वेध लागले आहेत. त्यासाठी, शिवसेा युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 5 नोव्हेंबरपासून प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांना 5 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून पहिलीच सभा रत्नागिरी येथून म्हणजेच कोकणातून होणार आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, लोकसभा निवडणुकीत येथील मतदारसंघात महायुतीचा उमेदवार विजयी झाला आहे. कोकणातील दोन्ही मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विजयी झाल्यामुळे आता विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे. त्यामुळेच, ते रत्नागिरी जिल्ह्यातून आपल्या निवडणूक प्रचारसभांची सुरूवात करत आहेत.

शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा प्रचारसभांसाठीचा नियोजित दौरा आखण्यात आला असून  5 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर असा दौरा आहे. या दौऱ्याची सुरुवात कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातून होणार असून  17नोव्हेंबर रोजी मुंबईत सांगता सभा होणा आहे. तर, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात 16 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे सभा घेऊन जनतेला संबोधित करतील. उद्धव ठाकरे यांच्या या काळात 20 ते 25 जाहीर सभा होणार असल्याची माहिती शिवेनेतील वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे. त्यामध्ये मविआच्या संयुक्त सभांचा देखील समावेश असणार आहे. तर, दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांच्या देखील सभा होणार आहेत. त्यामध्ये, संजय राऊत, सुषमा अंधारे याही विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभांमधून आपली तोफ धडाडणार आहेत. त्यामुळे, दिवाळीनंतरच खरे फटाके फुटणार आहेत. 
 
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आता 288 मतदारसंघातील लढती निश्चित झाल्या असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. त्यामुळे, या लढाईत सर्वच राजकीय पक्षांचे नेते आपलं सर्वस्व पणाला लावून मैदानात उतरले आहेत. त्यामध्ये, राज्यातील ठाकरे, पवार, फडणवीस, शिंदे आणि काँग्रेसमधील दिग्गज नेते स्वत: निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. यंदा प्रथमच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हेही माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यासाठी, सर्वच बड्या नेत्यांकडून प्रचारासाठी रणनीती आखली जात आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याही महाराष्ट्रात 10 ते 15 सभा होणार असल्याची माहिती आहे. दिवाळीनंतरच म्हणजेच शेवटच्या टप्प्यातील प्रचारसभेत नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील प्रमुख मतदारसंघात सभा घेतील. यांसह, भाजपकडून 40 स्टारप्रचारकांची यादाही जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, केंद्रीयमंत्र्यांचाही समावेश आहे.

हेही वाचा

भिवंडीत कारमध्ये घबाड, रोकड जप्त; मतदारसंघात स्टॅटिक सर्विलन्स टीमची कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Shara Pawar: शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrirang Barne  महायुतीचा धर्म पाळणार,शिवसेना सुनील शेळकेंसोबतABP Majha Headlines : 10 PM : 30 OCT 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaShankar Jagtap Vs Rahul Kalate | दिवाळी फराळाच्या निमित्ताने जगताप-कलाटेंच्या एकमेकांना शुभेच्छाAaditya Thackeray Majha Vision | मविआत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? आदित्य ठाकरे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Shara Pawar: शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
पालघरमध्ये सापडलं 5 कोटीचं घबाड, पोलिसांच्या उत्तरानं आमदार अवाक्; दादरा नगरहून महाराष्ट्रात आली रक्कम
पालघरमध्ये सापडलं 5 कोटीचं घबाड, पोलिसांच्या उत्तरानं आमदार अवाक्; दादरा नगरहून महाराष्ट्रात आली रक्कम
India China complete Disengagement in Depsang Demchok : भारत-चीन सीमेवर डेपसांग आणि डेमचोकमधून सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण; दोन्ही सैनिक एकमेकांना उद्या मिठाई भरवणार!
भारत-चीन सीमेवर डेपसांग आणि डेमचोकमधून सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण; दोन्ही सैनिक एकमेकांना उद्या मिठाई भरवणार!

Embed widget