एक्स्प्लोर

TN Exit Poll Result 2021: तामिळनाडूमध्ये DMK च्या नेतृत्वात सरकार स्थापना होणार, AIADMK-BJP युतीचा पराभव

एबीपीच्या एक्झिट पोलनुसार राज्यातील सत्ताधारी एआयएडीएमके (AIADMK) युतीला तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत जोरदार पराभवाचा सामना करावा लागणार आहे.

तमिळनाडूच्या राजकारणातील दिग्गज नेते जयललिता आणि एम. करुणानिधी यांच्याशिवाय इथं पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. या दोघांच्या अनुपस्थितीत राज्यात निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. एबीपीच्या एक्झिट पोलनुसार राज्यातील सत्ताधारी एआयएडीएमके (AIADMK) युतीला तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत जोरदार पराभवाचा सामना करावा लागणार आहे. भाजपसोबत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी मैदानात उतरलेल्या अण्णाद्रमुक आघाडीला राज्यातील 234 विधानसभा जागांपैकी केवळ 58 ते 70 जागांवर समाधान मानावे लागेल. म्हणजेच आता सत्ता त्याच्या हातातून निसटेल.

तामिळनाडूमध्ये द्रमुक-काँग्रेसचे युती सरकार स्थापन होण्याचा अंदाज
तर दुसरीकडे एक्झिट पोलनुसार तामिळनाडूमध्ये यावेळी द्रमुक-काँग्रेस आघाडी राज्यात सरकार स्थापन करेल. या आघाडीला 160 ते 172 जागा मिळतील असा अंदाज आहे. दुसरीकडे टीटीव्ही दिनाकरन यांच्या नेतृत्वाखालील एएमएमके युतीला केवळ 0 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 118 जागा जिंकणे आवश्यक आहे.

कोणाला किती जागांचा फायदा
तामिळनाडूमध्ये मागच्या वेळी म्हणजेच 2016 च्या विधानसभा निवडणुकीत AIADMK आघाडीला 134 जागा मिळाल्या होत्या तर DMK आघाडी केवळ 98 जागांवर मर्यादित होती. तर एक्झिट पोलनुसार यावेळी एआयएडीएमके युतीला 70 जागांचा फटका बसताना दिसत आहे. तर डीएमके आघाडी 68 जागा जास्त घेत सत्तेत येताना दिसत आहे. स्टालिन यांच्या नेतृत्वात राज्याची सत्ता जाणार आहे.

तामिळनाडू निवडणुकांमध्ये कोणाची कोणासोबत युती?
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी राज्यातील राजकीय आघाडीमध्ये एकत्र आले. अण्णाद्रमुकने भाजपबरोबर युती केली आहे. त्यांच्यासमवेत पीएमके, टीएमएमके, पीडीके, एआयएमएमके, पीटीएमके, पीबीके, एमआरएमके आणि टीएमसी आहेत. दुसरीकडे, द्रमुकबरोबरच काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, एमडीएमके, केएमडीके, आययूएमएल, एमएमके, टीव्हीके, एटीपी आणि एआयएफबी निवडणूक रिंगणात होते.

तर कमल हासन यांच्या पक्षाने मक्कल निधी मय्यम (एमएनएम) बरोबर एकत्र येऊन एआयएसएमके, आयजेके आणि टीएमजेकेसोबत निवडणूक लढवली. याबरोबरच टीव्हीटी दिनाकर यांच्या पक्षाचे एएमएमके यांच्यासह अस्सुद्दीन ओवैसींच्या एआयएमआयएम, डीएमडीके आणि एसडीपीआयसह निवडणूक मैदानात उतरली होती. तामिळनाडूच्या 234 जागांसाठी 6 एप्रिल रोजी मतदान झाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget