एक्स्प्लोर

संभाजीराजेंनी शिवबंधन बांधून राज्यसभा लढवावी; पहिल्यांदाच शिवसेनेकडून 'ओपन ऑफर'

Shiv Sena MP Sanjay Raut on Rajya Sabha Election 2022 : संभाजीराजेंनी शिवसेनेची उमेदवारी स्विकारुन निवडणूक लढवावी, असं संजय राऊत म्हणाले आहेत. पहिल्यांदाच शिवसेनेकडून संभाजीराजेंना ओपन ऑफर दिली आहे.

Shiv Sena MP Sanjay Raut on Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेसाठी सहावा उमेदवार शिवसेनेचाच असेल. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी शिवसेनेची उमेदवारी स्विकारुन निवडणूक लढवावी, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेसाठी उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आज पहिल्यांदाच यासंदर्भात संजय राऊतांनी उघडपणे भाष्य केलं. त्यामुळे आता संभाजीराजे छत्रपती शिवसेनेनं दिलेली ऑफिर स्विकारणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तोच पक्ष पुढे नेईल. फक्त खास राज्यसभा निवडणुकांवरच चर्चा झालेली नाही. इतर अनेक विषयांवरही चर्चा झाली. आजच्या बैठकीला इतरही काही आमदार होते. विनायक राऊतही होते. अनेक विषयांवर चर्चा सुरु आहे."

मराठा संघटना प्रमुखांच्या भेटीबाबत बोलताना ते म्हणाले की, "मराठा संघटना प्रमुखांचंही काही म्हणणं आहे. संभाजीराजे छत्रपतींचंही काही म्हणणं आहे. तसेच, शिवसेनेचाही मुद्दा आहे. आम्हा सर्वांचं, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की, सहावी जागा शिवसेनेची आणि शिवसेनेचा उमेदवार त्या जागेवरुन लढेन आणि विजयी होईल." संभाजीराजे छत्रपतींनी शिवसेनेत प्रवेश करावा, असं बोललं जात आहे, त्याबाबत विचारल्यावर बोलताना संजय राऊतांनी पुन्हा सहावी जागा ही शिवसेनेचीच असेल, असं म्हटलं. तसेच, संभाजीराजे छत्रपती हे आमचेच आहेत. त्यांचं आमचं एक नातं आहे. आम्ही त्यांना विनंती केली आहे की, तुम्हाला जर ही निवडणूक लढायची असेल, तर शिवसेनेत या मग त्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. यामध्ये कोणाच्या भावना दुखावण्याचा प्रश्न येत नाही."

राज्यसभेची सहावी जागा शिवसेनेचीच : संजय राऊत 

"राज्यसभेची सहावी जागा शिवसेनेची आहे. आम्हाला राज्यसभेत एक जागा वाढवायची आहे. मागच्या वेळी राष्ट्रवादीनं त्यांची जागा वाढवली. पुढच्यावेळी आणखी एक पक्ष आपली जागा वाढवेल. घाट्यात आम्ही आहोत. शिवसेना शिवसेनेचाच उमेदवार पाठवण्यावर ठाम आहे.", असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Madha Lok Sabha : भाजपला माढ्यात मोठा धक्का! मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर एकत्रRohit Pawar on Sujay Vikhe : नगरमध्येही जले जावो होणार! रोहित पवार यांचा थेट सुजय विखेंवर हल्लाबोलPrakash Ambedkar : दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्यSharad Pawar : 14 ते 24 हे सत्तेत मंत्री होते, हिशेब मला विचारतात...पवारांचा शाहांवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
Embed widget