Eknath Shinde : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री का हवेत? शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेने दिली कारणे, म्हणाले....
Shiv Sena Dharmaveer Adhyatm Sena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री का हवेत? यासाठी शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या प्रदेशाध्यक्षानी हे पटवून दिले आहे.
Eknath Shinde Again CM मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे एकनाथ शिंदेंनी आज राजीनामा (Eknath Shinde Resigned) सुपूर्द केला. तर शपथविधीपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची राज्यपालांची एकनाथ शिंदेंना सूचना केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व मंत्रीमंडळाचा राजीनामा घटनेनुसार मानला जातो.
तर दुसरीकडे पुढचा मुख्यमंत्री कोण? याबाबत अनेक चर्चा आणि बातम्या समोर येत असताना राजकीय स्थरांवर मोठ्या घडामोडीही होत आहे. अशातच मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीमधून भाजपच्या देवेंद्र फडणवीस तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या नावाचा आग्रह केला जात आहे. मात्र सगळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे आता येणारा काळच ठरवणार आहे. मात्र या चर्चा रंगत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री का हवेत? यासाठी शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या प्रदेशाध्यक्षानी हे पटवून दिले आहे. अक्षयमहाराज भोसले यांनी एक यादी देत म्हणून आम्हाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच हवेत, असे त्यांनी पटवून दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच! शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेची आग्रही मागणी
१) सकल समाजाच्या विकासाला त्यांनी प्राधान्य दिलं म्हणून.. महिलांना आत्मसन्मान देणारे पहिले मुख्यमंत्री.
२) हिंदुत्वाचा विचार प्रामुख्याने आपल्या कृतीतून ते समोर घेऊन गेले..
३) महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असणाऱ्या वारीकडे त्यांनी विशेष लक्ष दिले..
४) छत्रपती शिवरायांचे सर्वाधिक पूर्णाकृती विग्रह शिंदेंच्या काळात झाले व गड किल्ल्यांचे संवर्धन व संरक्षण करण्याकरता त्यांनी पुढाकार घेतला..
५) गोमाता ही राज्यमाता निर्णयामुळे गोमातेचे रक्षणास बळकटी दिली..
६) दिंडीतील वारकऱ्यांना सेवानिधी दिला जो अद्याप कोणीच दिला नव्हता..
७) साधू संतांनाcxc मंत्रालयात येऊ लागू नये यासाठी विशेष यंत्रणा राबवली..
८) धर्म सत्तेस कायम तळमळीने श्रद्धेने सहकार्य केले..
९) १८ पगड ज्ञाती बांधवांना एकत्र घेऊन प्रवास करणारे पहिले मुख्यमंत्री..
१०) सकल राज्यातील जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध व सदैव उपलब्ध
११) सर्वसामान्यांना सहज उपलब्ध असणारे मुख्यमंत्री..
१२) समोर आलेल्या कार्याची बघतो पाहू असे न करता जागेवर तात्काळ निर्णय
१३ ) मोठ्या प्रमाणात सकल तीर्थक्षेत्रांचा विकास..
१४ ) वृद्ध कलावंतांच्या मानधनात मोठी वाढ..
अशा अन्य २०० पेक्षा अधिक गोष्टी आपणास आम्ही सांगू शकतो. असा दावा करत आम्हाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच हवेत. अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
संबंधित बातमी: