Maharashtra Next CM: नरेंद्र मोदी, अमित शाह नव्हे...महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण निवडणार?, अखेर नाव आलं समोर, 29 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणार
Maharashtra Next CM: महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडल्याचं समजतयं.
![Maharashtra Next CM: नरेंद्र मोदी, अमित शाह नव्हे...महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण निवडणार?, अखेर नाव आलं समोर, 29 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणार Maharashtra CM Union Defense Minister Rajnath Singh will decide who will be the Chief Minister of Maharashtra Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Maharashtra Next CM: नरेंद्र मोदी, अमित शाह नव्हे...महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण निवडणार?, अखेर नाव आलं समोर, 29 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/25/6d8ab53e13dcd0391c7eee4a3a62f1111732521466819987_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Next CM मुंबई: नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra CM Oath-Taking Ceremony) 26 तारखेला होणार अशी चर्चा होती, मात्र आता सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडल्याचं समजतयं. नुकताच मिळालेल्या माहितीनूसार महाराष्ट्रातील महायुती सरकारचा शपथविधी 29 नोव्हेंबरला होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या शपथविधी सोहळ्यात भाजपचे 25 आमदार, तर शिवसेना शिंदे गटाचे 5 ते 7 आमदार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 5 ते 7 शपथ घेतली जाणार आहे.
राजनाथ सिंह यांच्याकडे मोठी जबाबदारी-
महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी निवडणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. परंतु आता नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नव्हे, तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार, याचा निर्णय घेणार आहेत. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार, ही निवडण्याची मोठी जबाबदारी राजनाथ सिंह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात पुढे-
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात पुढे आहे. आज संध्याकाळी दिल्लीत होणाऱ्या वरीष्ठ नेत्यांच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत भाजपला मिळालेले मोठे यश आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मिळालेल्या यशानंतर भाजपच्या वरीष्ठ नेत्यांकडून शिक्कामोर्तब होणार आहे.
मुख्यमंत्रिपदावर भाजपचा दावा मजबूत-
आता महायुतीसमोर पहिलं आव्हान मुख्यमंत्री निवडीचं असेल. 137 जागा जिंकून आल्यामुळे मुख्यमंत्रिपदावर भाजपचा दावा मजबूत झाला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या समंजसपणावर विश्वास ठेवून भाजप मुख्यमंत्रीपद घेईल अशी दाट शक्यता आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं तिन्ही पक्षांच्या पारड्यात भरभरुन दान टाकलं आहे त्याचा सदुपयोग महाराष्ट्राच्या हितासाठी हे तिन्ही नेते पुढची पाच वर्ष करतील हीच अपेक्षा...
विधानसभेच्या निकालाचा अर्थ काय?
- स्थिर सरकारसाठी महाराष्ट्रानं सलग तिसऱ्यांदा मतदान केलं.
- भाजप सलग तिसऱ्यांदा सर्वात मोठा पक्ष ठरला.
- भाजपला सलग तिसऱ्यांदा 100 पेक्षा जास्त जागा मिळाल्या.
- भाजप आणि मित्रपक्षात समन्वय राखण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी...
- भाजपसोबत मित्रपक्षांनाही घवघवीत यश मिळालं.
- 58 जागा जिंकत शिवसेना पक्षात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं.
- अजित पवारांनी लोकसभेतील अपयश धुवून काढलं.
- राष्ट्रवादीने 41 जागा मिळवत भाजप-शिवसेनेला चांगली साथ दिली.
- विकास आणि भावनिक मुद्दे यांची सांगड घालण्यात यश आलं
- महिला मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी केलेले प्रयत्न सार्थकी लागले.
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)