एक्स्प्लोर

Shahapur Vidhan Sabha : शहापूर विधानसभेत दौलत दरोडा विजयी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणखी एक जागा

Shahapur Assembly Constituency Election 2024 : शहापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा विजयी झाले आहेत.

Shahapur Vidhan Sabha 2024 : शहापूर विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा विजयी झाले आहेत. शहापूरमध्ये यंदाच्या निवडणुकीत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत पाहायला मिळाली. शहापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा यांना तिकीट देण्यात आलं होतं, तर राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाने पांडुरंग बरोरा यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. या मतदारसंघात दौलत दरोडा विरुद्ध पांडुरंग बरोरा अशी थेट लढत पाहायला मिळाली. अखेर दौलत दरोडा यांनी बाजी मारली. 

शहापूर विधानसभा मतदारसंघ

शहापूर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र विधानसभेच्या ठाणे जिल्ह्यातील 18 मतदारसंघांपैकी एक आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघ इतर पाच विधानसभा मतदारसंघांसह भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा (ST) भाग आहे.

शहापूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती

  • पांडुरंग बरोरा (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष)
  • दौलत दरोडा (राष्ट्रवादी काँग्रेस)

शहापूर विधानसभा निवडणूक निकाल 2019

  • दौलत दरोडा (राष्ट्रवादी काँग्रेस) - विजयी,  76,053 मते 
  • पांडुरंग बरोरा (शिवसेना) - 60,949 मते

शहापूर विधानसभा निवडणूक निकाल 2014

  • पांडुरंग बरोरा (राष्ट्रवादी काँग्रेस) - विजयी,56,813 मते
  • दौलत दरोडा (शिवसेना) -  51,269 मते 
 
मतदारसंघाचा इतिहास

सह्याद्रीच्या पर्वत रांगातील डोंगरांनी वेढलेल्या शहापूर तालुका आहे. मुंबईसह - ठाणे जिल्ह्याचा तहान भागवणारा धरणांचा तालुका म्हणून शहापूरची ओळख आहे. शहापूर तालुक्याच्या उत्तरेकडे नाशिक जिल्हा, तर दक्षिणेस मुरबाड, कल्याण, भिवंडी हे तालुके तर पश्चिमेस वाडा तालुका आहे. शहापूरमध्ये आदिवासींची संख्या जास्त असल्याने हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. ठाकूर, वारली, कोकणा, कातकरी, काथोडी, महादेव कोळी, या आदिवासी जमाती शहापूर तालूक्यातील आदिवासी जमातीपैकी आहेत. एकूण लोकसंख्येत कुणबी आणि आगरी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. 

मतदारसंघातील सद्यस्थिती

शहापूर विधानसभा मतदारसंघ हा आदिवासींसाठी राखीव आहे. या मतदारसंघात कुणबी समाजाबरोबर प्रामुख्याने आदिवासी, कातकरी महादेव कोळी, वारली आणि ठाकूर समाज मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे या मतदारसंघात आदिवासी समाजाची मतं निर्णायक ठरतात. शहापूर विधानसभा मतदारसंघात पांडूरंग बरोरा यांचे वडील दिवंगत महादू बरोरा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले जाते. त्यांनी या भागाचे प्रतिनिधित्व केले, पुढे त्यांच्या निधनाने त्यांचे पुत्र पांडुरंग बरोरा हे या मतदारसंघात आमदार झाले. पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादीतील बंडानंतरही शरद पवारांसोबत एकनिष्ठ आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ambernath Vidhan Sabha : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ : शिवसेनेचे बालाजी किणीकर सलग चौथ्यांदा विजयी होणार की राजेंद्र वानखेडे बाजी पलटणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report
Indigo Flight : इंडिगो कधी सावरणार? प्रवास सुरळीत कधी होणार? Special Report
Nagpur Commissioner Name Plate : पगारावर समाधानी, अधिकारी अभिमानी Special Report
Ladki Bahin Yojana Politics : लाडकी बहीण वरून टोले, मुख्यमंत्री फडणवीसांचे शोले Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget