एक्स्प्लोर
पंतप्रधानांची पत्रकार परिषद म्हणजे ‘मौन की बात’!, राज ठाकरेंची मोदींवर टीका
पाच वर्षात पंतप्रधान मोदींची पहिलीच पत्रकार परिषद घेतली पण प्रश्नांना बगल मोदींच्या पत्रकार परिषदेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं.
मुंबई : पाच वर्षात एकदाही पत्रकारांना सामोरं न गेलेल्या पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपताना दिल्लीत भाजपची पत्रकार ही परिषद झाली. पंतप्रधान मोदींच्या या अभूतपूर्व पत्रकार परिषदेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे. पंतप्रधानांची पत्रकार परिषद... ‘मौन की बात’!, असे ट्विट करत राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला आहे.
यापूर्वीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडलं होतं. तर मनसेने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात राज्यात दहा प्रचार सभा घेतल्या. VIDEO | पत्रकार परिषद मोदींची, उत्तरं मात्र शाहांची | एबीपी माझा दरम्यान पाच वर्षात एकदाही पत्रकारांना सामोरं न गेलेल्या पंतप्रधान मोदींनी शक्रवारी पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी भाजप सरकारकडून करण्यात आलेली काम, लोकसभा निवडणुक आणि प्रचार याबाबत माहितीही दिली. मात्र त्यानंतर पत्रकारांकडुन विचारण्यात आलेल्या प्रश्नांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी उत्तरं दिल्याचं पाहायला मिळालं. यावेळी एका पत्रकाराने मोदींनी प्रश्न विचारला असता "अध्यक्षजी जवाब देंगे" असं म्हणत मोदींनी उत्तर देण्याचं टाळलं. याचवेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची देखील पत्रकार परिषद सुरु होती. "पंतप्रधान मोदींची पत्रकार परिषद ही अभूतपूर्व घटना आहे", या शब्दात राहुल गांधींनी मोदींच्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच "मोदी जिथे पत्रकार परिषद घेत आहेत, त्या खोलीचा दरवाजा बंद करण्यात आला आहे", असा आरोपही केला आहे. VIDEO | मोदींच्या पत्रकार परिषदेत मागचे दरवाजे बंद करण्यात आले : राहुल गांधी | एबीपी माझा संबंधित बातम्या Narendra Modi Press | "अध्यक्षजी जवाब देंगे" म्हणत मोदींचा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास नकार साध्वी प्रज्ञाला माफ करु शकणार नाही, नरेंद्र मोदींची नाराजी नोटबंदी करताना मोदींनी पूर्ण कॅबिनेटला कोंडून ठेवले होते : राहुल गांधी मोदींनी 18 प्रश्नांची टोलवलेली उत्तरं vs राहुल गांधींची सर्व 15 प्रश्नांना उत्तरंपंतप्रधानांची पत्रकार परिषद... ‘मौन की बात’ !#PMPressMeet #PMPressConfere
— Raj Thackeray (@RajThackeray) May 17, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement