Amol Mitkari On Ajit Pawar: पायलटला संमोहित करण्यात आले होते का? अजितदादांच्या अपघातावरुन मिटकरींच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
Amol Mitkari On Ajit Pawar: पायलटला संमोहित करण्यात आले होते का? अजितदादांच्या अपघातावरुन मिटकरींच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी अनेक गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. मात्र,रविवारी त्यांनी या सगळ्याचा कळस गाठत अजित पवार (Ajit Pawar) यांना मारण्यासाठी त्यांच्या विमानात सुसाईड बॉम्बर अर्थात आत्मघातकी बॉम्बरचा वापर झाला असावा का, अशी शंका बोलून दाखवली आहे. एवढेच नव्हे अजित पवार यांच्या विमानाचे पायलट सुमित कपूर यांना संमोहित केले होते का, असा सवालही अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. अमोल मिटकरी यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा खळबळजनक दावा केला. दादांच्या विमान अपघाताप्रकरणात कुटुंबातील सदस्य म्हणून आमदार रोहित पवार पत्रकार परिषद घेत आहेत. त्यांच्या पत्र परिषदेकडे महाराष्ट्रसह देशाचे लक्ष आहे. मला अपेक्षा आहे 10 तारखेच्या पत्रकार परिषदमध्ये अनेक गोष्टी कव्हर होतील. जे काही पुरावे त्यांच्याकडे असतील ते सादर करतील.त्यामुळेच रोहित पवारांची पत्रकार परिषद पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं.
























