Sanjay Raut On BJP BMC Mayor : मराठी मतांच्या दबावामुळे भाजपने मराठी महापौर केला
Sanjay Raut On BJP BMC Mayor : मराठी मतांच्या दबावामुळे भाजपने मराठी महापौर केला
मुंबई महानगरपालिकेच्या नव्या महापौर रितू तावडे (Ritu Tawade) यांनी मला इथं प्रत्येक मुंबईकरासाठी काम करायचं आहे. जर मुंबईकरांची इच्छा आहे की त्यांना चालायला फुटपाथ नाही तर त्यांच्या मनात यावरुन रोष आहे. मुंबईकर हे टॅक्स पेअर आहे. मुंबईकर अलर्ट आहेत, शिक्षित आहेत, संवेदनशील आहेत. त्यांना असं वाटतंय की, आम्हाला रस्त्यावरुन चालायचय पण आम्हाला रस्ताच उपलब्ध नाही. मग या रस्त्यांवर कोणी अतिक्रमणं केली आहेत, तर बांगलादेशी रोहिंग्यांनी! त्यामुळं जर मुंबईला आपल्याला सेफ ठेवायचं असेल सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला या लोकांना इथून बाहेर काढावं लागेल आणि ही आमची प्राथमिकता आहे, असे वक्तव्य केले. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रितू तावडे यांच्यावर निशाणा साधलाय. संजय राऊत म्हणाले की, महापौरांनी दिल्लीत यायला पाहिजे. बांगलादेश मुक्त करण्याचे त्यांचे जे काही धोरण आहे ते त्यांच्या हातात नसून ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात. महापौरांनी मुंबई शहराच्या विकासावर बोलायला पाहिजे. त्या पुन्हा हिंदू-मुसलमान करणार असतील तर काल व्यासपीठावर सलमान खानला बोलावून काही उपयोग झालेला नाही, असे त्यांनी म्हटले.
























