Laxman Hake : 2029 निवडणुकीत भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ..हाकेंच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून रोज नवनवीन आरोप होऊ लागल्यानंतर आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या विषयावर जोरदार टोलेबाजी केली ..
अजित दादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर कोण विमानात बॉम्ब ठेवला म्हणते कोण आत्मघातकी हल्ला म्हणते हा सर्व प्रकार अजित दादांच्या मृत्यूचे भांडवल करून स्वतःचे अस्तित्व ठेवण्याची तडफड असल्याचा टोला हाके यांनी लगावला.
अमोल मिटकरी याला फक्त भुंकण्यासाठी अजितदादांनी आमदार केले होते .. त्याचे कर्तृत्व म्हणजे अजितदादांच्या चपल्या उचलणे एवढेच होते ..
आता अजितदादाही राहिले नाहीत आणि त्याचे आमदारकी ही संपत आलेली असताना अस्तित्व टिकवण्यासाठी ही केविलवाणी धडपड केली जात असल्याचा टोलाही हाके यांनी लगावला.
जर यांच्याकडे कुठली पुरावे असतील तर त्यांनी तातडीने पोलिसांना किंवा तपास यंत्रणा यांच्याकडे देणे गरजेचे आहे .. नसेल तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि कोणावर विश्वास नसेल तर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आहेत त्यांच्याकडे पुरावे द्यावेत ..
मात्र केवळ प्रसिद्धीसाठी आणि स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी केविलवाणी धडपड करू नये अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.



















