एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मन की बात'ला टक्कर द्यायला 'अपनी बात राहुल के साथ'
विविध स्तरातील जनतेशी संवाद साधण्यासाठी त्यांनी 'अपनी बात राहुल के साथ' हा नवीन उपक्रम सुरु केला आहे. पहिल्या भागात राहुल गांधी विद्यार्थ्यांशी मोदी सरकार, शिक्षण व्यवस्था यासारख्या काही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करताना दिसत आहेत.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर 'नमो वर्सेस रागा' ही लढाई आणखी प्रबळ होण्याची चिन्हं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात'ला टक्कर देण्यासाठी काँग्रेसचे 'अपनी बात राहुल के साथ' ही मोहीम राबवणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गेल्या काही महिन्यात सक्रिय झाले आहेत. विविध स्तरातील जनतेशी संवाद साधण्यासाठी त्यांनी 'अपनी बात राहुल के साथ' हा नवीन उपक्रम सुरु केला आहे. पहिल्या भागात राहुल गांधी विद्यार्थ्यांशी मोदी सरकार, शिक्षण व्यवस्था यासारख्या काही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करताना दिसत आहेत. तरुणाईचे विचार जाणून घेण्यासाठी चर्चा करण्याचा निर्णय घेतल्याचं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला होता. राहुल गांधी हे विद्यार्थ्यांना स्वत:ची ओळख 'मी राहुल गांधी. काँग्रेसचा अध्यक्ष' अशी करुन दिली. दिल्लीतील एका रेस्तराँमध्ये राहुल आणि विद्यार्थ्यांची भेट घडली.
या भेटीवेळचा एक व्हिडिओ शेअर करताना राहुल यांनी विद्यार्थ्यांकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'मी काही दिवसांपूर्वी देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. ती भेट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. आमच्यात विचारांची देवाण-घेवाण झाली. यातून मी खूप काही शिकलो' असं राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे.
गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी चर्चा करत त्यांना मार्गदर्शन केलं होतं.
I met a group of really interesting students from all over India, for dinner a few days ago. I learnt a lot from the wonderful exchange of ideas & perspectives. Here's a short video with the highlights of our interaction.#ApniBaatRahulKeSaath pic.twitter.com/H9pW3t1ur1
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 5, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
राजकारण
Advertisement