एक्स्प्लोर
शरदराव, काश्मीर तोडणाऱ्यांसोबत तुम्ही कसे? तुमच्या पक्षाचे नाव तर राष्ट्रवादी : मोदींचा पुन्हा पवारांवर हल्लाबोल
ज्या काश्मीरसाठी देशातील हजारो सैनिकांनी बलिदान दिलं ते काश्मीर सोडायचे का? असे म्हणत तुम्हीदेखील विदेशी चष्म्यातून बघायला लागलात काय अशी टीका मोदींनी पवारांवर केली.
अहमदनगर : देशाच्या नावावर काँग्रेस पक्षाची साथ सोडणाऱ्या शरद पवारांना आता काय झालंय काही समजत नाही. देशात दोन पंतप्रधान आणायची भाषा करत काँग्रेसवाले काश्मीरला तोडण्याची भाषा करत आहेत. असं असताना शरदराव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत राहून तुम्हाला झोप कशी लागते, या अशा शब्दात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेला संबोधन करताना ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसचे नेते काश्मीरला वेगळं करायचं म्हणणात. मात्र शरद पवारांना काय झालंय? तुम्ही देशाच्या नावावर काँग्रेस सोडली. आता दोन पंतप्रधान होणार यावर तुम्ही गप्प का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
UNCUT | शरदराव, काश्मीर तोडणाऱ्यांसोबत तुम्ही कसे?, पंतप्रधान नरेंद्र मोदींच भाषण | अहमदनगर | एबीपी माझा
ज्या काश्मीरसाठी देशातील हजारो सैनिकांनी बलिदान दिलं ते काश्मीर सोडायचे का? असे म्हणत तुम्हीदेखील विदेशी चष्म्यातून बघायला लागलात काय अशी टीका मोदींनी पवारांवर केली. तुम्ही राष्ट्रवादी असं तुमच्या पक्षाचे नाव ठेवलंय, मात्र भूमिका शोभणारी नाही. शरदराव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर राहात असून तुम्हाला झोप कशी येतेय? असा सवालही मोदींनी यावेळी केला.
अहमदनगरच्या सभेत देखील मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. 'शिर्डी साईबाबाच्या सानिध्यात असलेल्या या नगरीला माझे नमन. महाराष्ट्र आणि अहमदनगरच्या सर्व बांधवाना उद्याच्या रामनवमीच्या खूप शुभेच्छा' अशा शब्दात मोदींनी सुरुवातीला शुभेच्छा दिल्या.
यावेळी मोदी म्हणाले की, 5 वर्षांपूर्वी इथं आलो होतो, त्यावेळी कमी लोक होती, मात्र आज दुपटीपेक्षा जास्त लोक आहेत. तुमच्या या प्रेमाला आणि या विश्वासाला मी नमन करतो. तुम्ही एवढ्या उन्हात इथं येत माझ्यावरील कर्ज वाढवलं आहे असं मोदी यावेळी म्हणाले.
आज जग भारताला महाशक्ती म्हणून ओळखत आहे. तुम्ही देशाचा निर्णय घ्यायला निघाला आहात. आता देशात इमानदार चौकीदार चालणार आहे की भ्रष्टाचारी नामदार चालणार आहे हे तुम्ही ठरवायचं आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.
VIDEO | भाषण थांबवण्यास सांगितल्यावर खासदार दिलीप गांधींचा संताप | अहमदनगर | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
करमणूक
पुणे
Advertisement