UP Election 2022: पंतप्रधान मोदी प्रचारासाठी रणांगणात, उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये आज सभा
विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर येणार आहेत.
UP Assembly Elections : सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. निवडणुकांच्या निमित्ताने उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर येणार आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने आज प्रथमच पंतप्रधान जाहीर सभा घेणार आहेत. बिजनौर येथे पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे.
विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर येत आहेत. सोमवारी बिजनौरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधीत करणार आहेत. बिजनौर विधानसभेच्या वर्धमान पदवी महाविद्यालयात सकाळी 11 वाजून 20 मिनीटांनी त्या कार्यकर्त्यांना संबोधीत करणार आहेत.
पंतप्रधान आज 3 जिल्हे कव्हर करतील. ज्यामध्ये बिजनौर, मुरादाबाद, अमरोहा जिल्ह्यांचा समावेश आहे. या तीन जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदासंघाकडे लक्ष्य असणर आहे. रॅलीचे प्रक्षेपण बिजनौर येथून केले जाणर आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 10 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यादरम्यान, निवडणूक आयोगाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सुमारे एक हजार कार्यकर्ते या रॅलीचा भाग असणार आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये 7 टप्प्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यातील पहिला टप्पा हा 10 फेब्रुवारीला पार पडणार आहे. तर 7 मार्चला अंतिम टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 10 मार्चला सर्व विधानसभांच्या जागांचे निकाल जाहीर होणर आहेत. दरम्यान, रविवारी पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशमधील मथुरा, आगरा आणि बुलंदशहर येथील 21 विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधला. आज सोमवारी दुपारी अडीच वाजता पंतप्रधान उत्तराखंडच्या जनतेशी देखील ऑनलाईन संवाद साधणार आहेत. यामध्ये ते हरिद्वार आणि डेहराडून या 2 जिल्ह्यांतील मतदारांशी संवाद साधणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: