Pankaja Munde : उंचीवर जायचं होतं, पण संधी मिळाली नाही; तुमचं, माझं आणि जिल्ह्याच दुर्भाग्य : पंकजा मुंडे
Pankaja Munde : उंचीवर जायचं होतं, पण संधी मिळाली नाही; तुमचं, माझं आणि जिल्ह्याच दुर्भाग्य असल्याचे आमदार पंकजा मुंडे म्हणाल्या.
Pankaja Munde, बीड : "मला खासदार व्हायचं होतं, पण आमदार झाले. महाराष्ट्राला मला काही केंद्रात जाऊ द्यायचं नव्हतं. मला बीड जिल्हा राजकारणच मैदान वाटत नाही. मी गेलेल्या गोष्टीचा कधी विचार करत नाही. पावने सात लाख मते मला लोकांनी दिले. उंचीवर जायचं होत ती संधी मिळाली नाही, तुमचं माझं आणि जिल्ह्याच दुर्भाग्य आहे", असं भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या बीडमधील प्रचार सभेत बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी अधिकृत उमेदवार कसा ठरतो याचा फॉर्म्युला सांगितला.
पंकजा मुंडे म्हणाल्या, मला कधीच वाटलं नाही मला घड्याळाचा प्रचार करावा लागेल. पंकजा मुंडे यांनी. आम्ही पाहुणे कलाकार आहेत. स्टार प्रचारक आहोत. एका पक्षाचे दोन पक्ष झाले. संपूर्ण पक्ष घेऊन, तुकडा घेऊन नवीन सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली. लोकांनी महायुतीला स्वीकारले आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आणण्यासाठी योगदान आहे. दर महिन्याला पंधराशे रुपये ओवाळणी घालत आहेत. मोदीजी सरकारमध्ये आले आहेत तर महायुतीचा मुख्यमंत्री देण्यासाठी आमदार महायुतीचा द्यावा लागेल.
खोटे गुन्हे दाखल केले नाहीत कधी त्रास दिला नाही. लोकसभेमध्ये कारस्थानाची परिस्थिती निर्माण झाली. तोंडावर एक माघारी एक पोटात एक ओटात एक असा माझा स्वभाव नाही. आष्टीमध्ये वेगळी परिस्थिती आहे. मी आमच्या उमेदवाराच्या प्रचाराला जाणार तुम्ही तुमच्या उमेदवाराच्या प्रचाराला जा. महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीवर पंकजा मुंडे यांनी भाष्य केले. माझा जिल्हा आहे, माझ मैदान आहे. भारतीय जनता पार्टीतील काही लोकांनी बंडखोरी करत उमेदवारांनी फॉर्म भरला असेल तर त्याच्या पाठीशी मी नाही, असंही पंकजा यांनी स्पष्ट केलं.
पंकजा मुंडे काय काय म्हणाल्या?
- मला वाहायच होत खासदार झाले आमदार
- महाराष्ट्राला मला काही केंद्रात जाऊ द्यायचं नव्हतं
- मला बीड जिल्हा राजकारणच मैदान वाटत नाही
- मी गेलेल्या गोष्टीचा कधी विचार करत नाही.
- पावने सात लाख मते मला लोकांनी दिले.
- उंचीवर जायचं होत ती संधी मिळाली नाहीं.. तुमचं माझं आणि जिल्ह्याच दुर्भाग्य..
- मला कधीच वाटलं नाही मला घड्याळाचा प्रचार करावा लागेल..
- एका पक्षाचे दोन पक्ष झाले.. संपूर्ण पक्ष घेऊन तुकडा घेऊन नवीन सत्ता मोदी महाराष्ट्रात स्थापन केली..
- लोकांना महायुती स्वीकारले आहे..
- लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आणण्यासाठी योगदान आहे..
- दर महिन्याला पंधराशे रुपये ओवाळणी घालत आहेत.
- मोदीजी सरकारमध्ये आले आहेत तर महायुतीचा मुख्यमंत्री देण्यासाठी आमदार महायुतीचा द्यावा लागेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महाविकास आघाडीचा जाहीरनामा म्हणजे अफवा, कोणीही विश्वास ठेवणार नाही, बावनकुळेंचा हल्लाबोल