(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Narayan Rane : आम्ही सकाळी इकडे, संध्याकाळी तिकडे नाही, माहीममध्ये महायुतीच्या सदा सरवणकरांना पाठिंबा : नारायण राणे
Narayan Rane on Mahim : माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर यांना पाठिंबा असल्याचे खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे.
Narayan Rane on Mahim , सिंधुदुर्ग : माहीम विधानसभा मतदारसंघ राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मैदानात उतरवले आहे. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर हे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, माहीम विधानसभा मतदारसंघाबाबत माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सिंधुदुर्गमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.
आम्ही सदा सरवणकर यांच्यासाठी काम करणार
नारायण राणे म्हणाले, माहीममध्ये महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर आहेत, आम्ही त्याच्यासाठीच काम करणार आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सकाळी एकीकडे आणि संध्याकाळी दुसरीकडे त्यातले आम्ही नाहीत. आम्ही पर्मनंट आहोत, असं म्हणत राणे यांनी सदा सरवणकर यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
निलेश राणे कमीत कमी 50 हजारच्या मताधिक्याने विजयी होतील
पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत कुडाळ मालवणमध्ये निलेश राणे यांच नाव घोषित झाल्यावर त्यांचं स्वागत केल जात आहे. कमीत कमी 50 हजार च्या वर मताधिक्याने विजयी होतील. जिल्ह्यातील तिन्ही उमेदवार विजयी होतील. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र गतिमान व्हावा यासाठी प्रयत्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रयत्न केले. निलेश राणे खासदार असताना भरीव काम केले होते. वैभव नाईक लोकसप्रतिनिधी असताना वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिन्या पाहत नाही. त्यामुळे त्यांना माझ्या कामाची माहिती नाही. कुडाळ मालवणमध्ये वैभव नाईक यांनी काय काम केलं? मी केव्हा टक्केवारी घेतली नाही हा माझा दोष आहे का? दोन लाख दोन हजार लाडक्या बहिणींना लाभ मिळाला. याचा आम्हाला फायदा होणार आहे. जरांगे पाटील यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेतला.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. रोजगार निर्माण होत आहे. प्रगतीशील महाराष्ट्र निर्माण करण्याचं काम आमचं सरकार करत आहेत. प्रत्येक मतदारसंघात आम्ही चांगले उमेदवार दिले आहे. महायुतीचं सरकार पुन्हा एकदा येईल, असा मला विश्वास आहे. जनहित आणि जनकल्याण हाच आमचा मुद्दा आहे. निलेश राणे यांनी जिल्ह्यात विकासाचं काम केलं. लोकसभेत देखील चांगलं काम केलं आहे, असंही राणे म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या