एक्स्प्लोर
मुस्लीम लीग हा व्हायरस आहे, त्यामुळेच देशाची फाळणी झाली : योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी वादग्रस्त वक्तव्यं करणे सुरुच ठेवले आहे. आदित्यनाथ यांनी आता मुस्लीम लीगच्या आडून काँग्रेसवर टीका केली आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी वादग्रस्त वक्तव्यं करणे सुरुच ठेवले आहे. आदित्यनाथ यांनी आता मुस्लीम लीगच्या आडून काँग्रेसवर टीका केली आहे. आदित्यनाथ यांनी मुस्लीम लीगला व्हायरस संबोधले आहे. 'या व्हायरसने काँग्रेस संक्रमित झाली आहे', असे म्हणत आदित्यनाथांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
आदित्यनाथ यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मुस्लीम लीग एक व्हायरस आहे. हा असा व्हायरस आहे, ज्यापासून कोणीही वाचू शकलेला नाही. आज मुख्य विरोधी पक्ष असलेला कांग्रेस या व्हायरसने संक्रमित झाला आहे. विचार करा जर काँग्रेस पक्ष या निवडणुकीत जिंकला तर काय होईल? ते जिंकले तर हा व्हायरस संपूर्ण देशभर पसरेल.
योगींनी त्यानंतर अजून एक ट्वीट करुन म्हटले आहे की, "1857 च्या स्वातंत्र्य संग्रामावेळी संपूर्ण देश क्रांतीकारक मंगल पांडे यांच्यासोबत इंग्रजांविरोधात उभा ठाकला होता. त्यानंतर हा मुस्लीम लीग नावाचा व्हायरस आला आणि संपूर्ण देशभर पसरला. या व्हायरसमुळे देशाची फाळणी झाली. आज पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा हिरवे झेंडे फडकू लागले आहेत. काँग्रेस पक्ष या व्हायरसने संक्रमित झाला आहे. सावधान राहा!"मुस्लिम लीग एक वायरस है। एक ऐसा वायरस जिससे कोई संक्रमित हो गया तो वो बच नहीं सकता और आज तो मुख्य विपक्षी दल कांग्रेस ही इससे संक्रमित हो चुका है।
सोचिये अगर ये जीत गए तो क्या होगा ? ये वायरस पूरे देश मे फैल जाएगा। — Chowkidar Yogi Adityanath (@myogiadityanath) April 5, 2019
1857 के स्वतंत्रता संग्राम में मंगल पांडे के साथ पूरा देश अंग्रेजों के खिलाफ मिल कर लड़ा था, फिर ये मुस्लिम लीग का वायरस आया और ऐसा फैला कि पूरे देश का ही बंटवारा हो गया आज फिर वही खतरा मंडरा रहा। हरे झण्डे फिर से लहर रहे। कांग्रेस मुस्लिम लीग वायरस से संक्रमित है, सावधान रहिये।
— Chowkidar Yogi Adityanath (@myogiadityanath) April 5, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement