Mumbai Crime : मोठी बातमी : निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत व्हॅनमध्ये सापडल्या 6500 किलो चांदीच्या विटा
Mumbai Crime : मुंबईतील विक्रोळीमध्ये एका एका कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ उडाली आहे.
Mumbai Crime : मुंबईतील विक्रोळीमध्ये एका कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या आहेत. विकोळी पोलिसांनी व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पकडलेल्या या विटा एकूण साडेसहा टन इतक्या आहेत. करोडोंच्या घरात यांची किंमत आहे. या चांदीच्या विटा मुलुंडमधील एका गोदामामध्ये ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून ठेवण्यासाठी चाल्या होत्या. या विटा अधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोग, इन्कम टॅक्स, पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
यापूर्वी मुंबईतील भुलेश्वरमध्ये देखील सापडली होती मोठी रोकड
मुंबईत यापूर्वीही भुलेश्वरमध्ये देखील 1 कोटी 32 लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं होतं. याचाही तपास पोलिसांनी सुरु केला होता. शिवाय पुण्यात देखील दोन ठिकाणी पोलिसांनी मोठं घबाड जप्त केलं होतं. पुण्यात रोकड नेण्यासाठी आरोपींकडून कारचा वापर करण्यात आला होता. आता मुंबईतील भुलेश्वर प्रकरणात पाच लोक संशयितरित्या बॅग घेऊन जात होते. भुलेश्वरसारख्या वर्दळीच्या ठिकाणाहून लोक कुठे जात होते. ही रक्कम कोणाची आहे, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी या पाचही जणांना पोलीस ठाण्यात आणण्यात होतं. याबरोबरच या प्रकरणात आयकर विभागाला पाचारण करण्यात आलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सातत्याने अशी रोकड सापडत असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यास सुरुवात केली आहे.
विधानसभेच्या रणधुमाळीआधी पैशाचा बाजार, मुंबईतून रोकड जप्त
निवडणुकीमुळे अनेक ठिकाणी लावलेल्या पोलीस बंदोबस्तात करोडो रूपयांची माया पकडली जावू लागली आहे. मात्र हे पैसे आडवू नका , राजकीय नेत्यांनी भ्रष्टाचारातून करोडो रूपये कमविले असून लोकांचा पैसा लोकापर्यंत पोचू द्या अशी वादग्रस्त मागणी रायगड कॅाग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी केली आहे. उरण मतदार संघात पैसाचा पैवूस पडणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीत शेकाप उमेदवाराला पाठिंबा द्यायचा कि ठाकरे गटाला या अडचणीत कॅाग्रेस सापडली आहे.
पुण्यात खेड शिवापूर टोल नाक्यावर 5 कोटी जप्त
मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील खेड-शिवापूर प्लाझाजवळ पोलिसांच्या नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी बेहिशेबी रोकड जप्त करण्यात केली होती. चालकासह कारमध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, कारमधील शहाजी नलावडे हे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे सहकारी असल्याची चर्चा होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या