एक्स्प्लोर
राज ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न, मनसेचा आरोप
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही वकिलांची फौज जमा करुन राज ठाकरेंच्या सभा कशा थांबवता येतील, यावर विचारमंथन केल्याचं मनसेचं म्हणणं आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह या जोडगोळीविरोधात महाराष्ट्रभरात सभांचा तडाखा लावला आहे. राज ठाकरेंच्या सभांच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरेंची तोफ थंड करण्यासाठी भाजपने कारवाया सुरु केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे राज ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा डाव असल्याचा आरोपही मनसेकडून केला जात आहे.
राज ठाकरेंची भाषणं थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दिल्लीतून प्रेशर येकत असल्याचा दावा मनसेने केला आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही वकिलांची फौज जमा करुन राज ठाकरेंच्या सभा कशा थांबवता येतील, यावर विचारमंथन केल्याचं मनसेचं म्हणणं आहे.
राज ठाकरेंचा मतदानाचा अधिकारच काढून घेऊ, असा विचार मुख्यमंत्री करत असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येत आहे. पुण्यात झालेल्या सभेत मनसे उपाध्यक्ष अभिजीत पानसे यांनी हा खळबळजनक आरोप केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीररित्या काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा दिला नसला, तरी आतापर्यंत झालेल्या सर्वच सभेत राज ठाकरेंनी मोदी सरकारची पोलखोल केली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री धास्तावून हा विचार करत असल्याचा दावा पानसेंनी केला आहे.
संबंधित बातम्या
मोदी आता जातीवर बोलतायेत, मग दलित बांधवांवर अत्याचार झाले तेव्हा गप्प का होते? : राज ठाकरे
माझ्या रमेश वांजळेची आठवण आल्याशिवाय राहत नाही : राज ठाकरे
'...तेव्हा बलात्काराच्या घटनांचं राजकरण करून तुम्ही का मतं मागत होतात?', राज ठाकरेंचा मोदींना सवाल
...म्हणून पीएम नरेंद्र मोदी सिनेमाचं प्रदर्शन थांबवलं : राज ठाकरे
नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून सर्वाधिक सैनिक शहीद झाले : राज ठाकरे
मी निवडणूक लढवत नाही, तरीही भाजपवाले फडफडतायत : राज ठाकरे
...तर महाराष्ट्रातील तरुणांना नोकरीत आरक्षणाची गरज लागणार नाही : राज ठाकरे
सरकारचा खोटारडेपणा उघड, 'मी लाभार्थी' जाहिरातीतील 'मॉडेल' राज ठाकरेंच्या मंचावर
मोदी-शाहांना मदत होईल, अशाही कोणाला मतदान करु नका : राज ठाकरे
स्टँड अप इंडिया, मेक इन इंडिया, स्मार्ट सिटीचं काय झालं? राज ठाकरेंचा भाजपला सवाल
भाजपने पैसे वाटले तर घ्या, मात्र त्यांच्याकडे परत ढुंकूनही पाहू नका : राज ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement