एक्स्प्लोर

Marathwada Region Result 2019 : मराठवाड्यातल्या नात्यांतील लढतींसह सर्वच जागांच्या निकालाची उत्सुकता

मराठवाड्यात 46 जागांच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मुंडे, क्षीरसागर पंडित यासारख्या नात्यांतील लढतींसह औरंगाबादमधील लढतींकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. मराठवाड्यातील निकाल कसा लागणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

मराठवाड्यात 46 जागांच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मुंडे, क्षीरसागर पंडित यासारख्या नात्यांतील लढतींसह औरंगाबादमधील लढतींकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. मराठवाड्यातील निकाल कसा लागणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. बीड विधानसभा क्षेत्रातून काका-पुतण्यातील वाद महाराष्ट्रात गाजला. शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांच्यातील ही लढत महत्वाची मानली जात आहे. परळीतील राजकीय घडामोडींकडे तर सर्वांचे बारीक लक्ष आहे. मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यातील वाद अगदीच टोकाला पोहोचला आहे. शेवटच्या क्षणी धनंजय मुंडे यांचे वक्तव्य आणि त्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्या. त्यामुळे या भावा-बहिणीच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून आहे. आष्टीमध्ये विद्यमान भाजपचे आमदार भीमराव धोंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे यांच्यात सरळ लढत आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघात रमेश आडसकर आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रकाश सोळंके आणि एमआयएमचे  अमर शेख अशी तिरंगी लढत आहे. केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीतून तिकीट घोषित झाल्यानंतर भाजपात प्रवेश केलेल्या नमिता मुंदडा आणि राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे यांच्यात सरळ लढत आहे. या ठिकाणी वंचितकडून माजी आमदार रामलिंग स्वामी यांचे नातू  वैभव स्वामी यांचेही आव्हान आहे. औरंगाबाद जिल्हा, 9 जागांवर 133 जणांचे भवितव्य कैद औरंगाबाद जिल्ह्यात नऊ जागांसाठी 133 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. सिल्लोड मतदारसंघात काँग्रेसकडून शिवसेनेत गेलेले अब्दुल सत्तार आणि काँग्रेसकडून कैसर आजाद यांच्यात मुख्य लढत आहे. तर बसपाचे संदीप सुरडकर, वंचित बहुजन आघाडीचे दादाराव वानखेडे देखील किती मतं घेतील याकडेही लक्ष लागून आहे. कन्नड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उदयसिंह राजपूत आणि राष्ट्रवादीचे संतोष कोल्हे यांच्यात मुख्य लढत असली तरी रावसाहेब दानवेंचे जावई शिवसेनेतून बाहेर पडलेले विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव हे देखील मुख्य शर्यतीत आहेत. वंचितचे  मारुती राठोड देखील किती मतं घेतात याकडे लक्ष आहे. फुलंब्री मतदारसंघातून भाजपचे नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉ कल्याण काळे हे मुख्य उमेदवार आहेत. तर वंचितकडून जगन्नाथ रिठे देखील मैदानात आहेत. औरंगाबाद मध्यमध्ये राष्ट्रवादीचे कदीर मौलाना, शिवसेनाचे प्रदीप जायस्वाल, वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ, एमआयएमकडून नासेरोद्दीन सिद्दीकी अशी चौरंगी लढत आहे. ही लढत अत्यंत चुरशीची मानली जात आहे. औरंगाबाद पश्चिममध्ये शिवसेनेचे संजय शिरसाट, एमआयएमचे अरुण बोर्डेआणि अपक्ष राजू शिंदे यांच्यात मुख्य लढत आहे. वंचित बहुजन आघाडीचे संदीप शिरसाठ देखील मैदानात आहे. औरंगाबाद पश्चिममध्ये राजू शिंदे यांच्यामुळे शिवसेना शिरसाट यांचा रास्ता कठीण मानला जात आहे. औरंगाबाद पूर्वमधून भाजपाचे अतुल सावे आणि एमआयएमचे डॉ गफ्फार कादरी यांच्यात मुख्य लढत आहे. सपाकडून कलीम कुरेशी यांचे देखील आव्हान असणार आहे. पैठण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दत्तात्रय गोर्डे, शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे, एमआयएमचे प्रल्हाद राठोड, वंचित बहुजन आघाडीचे विजय चव्हाण यांच्यात मुख्य लढत आहे. गंगापूर विधानसभा भाजपचे आमदार प्रशांत बंब, राष्ट्रवादीचे संतोष माने पाटील, वंचित बहुजन आघाडीचे अंकुश कालवणो मैदानात आहेत. वैजापूर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अभय चिकटगांवकर, शिवसेनेचे रमेश बोरनारे तथा वंचित बहुजन आघाडीचे प्रमोद नांगर हे मैदानात आहेत. लातूर लातूर ग्रामीणमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे धाकटे चिरंजीव धीरज देशमुख काँग्रेसकडून पहिल्यांदाच मैदानात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेने सचिन देशमुख यांना उतरवले आहे. मनसेचे अर्जुन वाघमारे आणि वंचितकडून अॅड.मंचकराव ढोणे हे देखील मैदानात आहेत. लातूर शहरमधून विलासरावांचे थोरले पुत्र काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित देशमुख पुन्हा काँग्रेसकडून मैदानात आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे शैलेश लाहोटी यांचे आव्हान आहे. निलंगा विधानसभा क्षेत्रात विद्यमान मंत्री संभाजी पाटील आणि त्यांचे चुलतभाऊ काँग्रेसचे  अशोकराव पाटील निलंगेकर यांच्यात काट्याची टक्कर आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे अरविंद भातंब्रे यांनी देखील जोर लावला आहे. अहमदपूरमधून भाजपाचे विनायकराव जाधव-पाटील आणि राष्ट्रवादीकाँग्रेसचे बाबासाहेब पाटील यांच्या मुख्य लढत आहे. वंचितच्या अयोध्या केंद्रे किती मतं घेतात याकडे लक्ष लागून आहे. उदगीर मतदारसंघात राष्ट्रवादीचे संजय बनसोडे आणि भाजपचे अनिल कांबळे यांच्या सरळ लढत आहे. वंचितकडून अतुल धावारे मैदानात आहेत. औसा मतदार संघाच्या लढतीकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमानी पवार भाजपकडून मैदानात आहेत. शिवाय वंचित बहुजन आघाडीकडून सुधीर पोतदार यांच्यासह 14 उमेदवार या ठिकाणाहून मैदानात आहेत. 83 - किनवट प्रदीप जाधव (नाईक) (राष्ट्रवादी) भिमराव केराम (भाजप) विनोद राठोड हमराज ऊईके 84 - हदगाव माधवराव पवार (काँग्रेस) नागेश आष्टीकर (सेना) डॉ.सुदर्शन भारती 85 - भोकर अशोक चव्हाण (काँग्रेस) बापुसाहेब गोरठेकर (भाजप) नामदेव आईलवार 86 - नांदेड उत्तर डी. पी. सावंत (काँग्रेस) बालाजी कल्याणकर (सेना) गंगाधर फुगारे मुकुंद चावरे नांदेड 87 - नांदेड दक्षिण मोहनराव हंबर्डे (काँग्रेस) राजश्री पाटील (सेना) फारूख अहमद इक्बाल 88 - लोहा दिलीप धोंडगे (राष्ट्रवादी) मुक्तेश्वर धोंडगे (सेना) शिवकुमार नरंगाळे 89 - नायगाव वसंतराव चव्हाण (काँग्रेस) राजेश पवार (आरपीआय) (भाजप) मारूतीराव कवळे 90 - देगलूर (SC) रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस) सुभाष साबणे (सेना) रामचंद्र भरांडे 91 - मुखेड भाऊसाहेब पाटील (काँग्रेस) डॉ. तुषार राठोड (भाजप) जीवन दरेगवे 92 वसमत चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी) डॉ. जयप्रकाश मुंदडा (सेना) शेख फरिद पटेल हिंगोली 93 - कळमनुरी संतोष तर्फे (काँग्रेस) संतोष बांगर (सेना) अजित मगर 94 - हिंगोली भाऊराव पाटील (काँग्रेस) तानाजी मुटकुळे (भाजप) वसिम देशमुख 95 - जिंतूर विजय भांबळे (राष्ट्रवादी) मेघना बोर्डिकर (रासप) (भाजप) मनोहर वाकडे परभणी 96 - परभणी रविराज देशमुख (काँग्रेस) डॉ. राहुल पाटील (सेना) सचिन पाटील शेख मोहम्मद गौस 97 - गंगाखेड डॉ.मधुसुदन केंद्रे (राष्ट्रवादी) विशाल कदम (सेना) विठ्ठल जवादे करुणा कुंदगिर रत्नाकर गुट्टे (रासप) 98 - पाथरी सुरेश वरपुडकर (काँग्रेस) मोहन फड (आरपीआय) (भाजप) विलास बाबर जालना 99 - परतूर सुरेशकुमार जेथलिया (काँग्रेस) बबनराव लोणीकर (भाजप) प्रकाश सोलंकी शिवाजी सावने 100 - घनसावंगी राजेश टोपे (राष्ट्रवादी) डॉ. हिकमत उडाण (सेना) विष्णु शेळके 101 - जालना कैलास गोरंट्याल (काँग्रेस) अर्जुन खोतकर (सेना) अशोक खऱात 102 - बदनापूर (SC) बबलू चौधरी (राष्ट्रवादी) नारायण कुचे (भाजप) राजेंद्र भोसले राजेंद्र मगरे 103 - भोकरदन चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी) संतोष दानवे (भाजप) दिपक बोराडे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget