(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Pune Assembly Elections 2024: पुणे शहरातील विधानसभेच्या आठपैकी सात जागांवर महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. शहरातील सर्व महत्त्वाचे मतदारसंघ पुन्हा एकद भाजपने जिंकले आहेत.
पुणे: राज्यातील विधानसभेच्या 288 मतदारसंघातील निकाल काल (शनिवारी) जाहीर झाले. राज्यभरात पुन्हा एकदा महायुतीने बाजी मारल्याचं चित्र दिसून आलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणावर जागा मिळवण्यात महायुतीला यश आलं आहे. पुणे शहरातील (Pune Assembly Elections 2024) विधानसभेच्या आठपैकी सात जागांवर महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. शहरातील (Pune Assembly Elections 2024) सर्व महत्त्वाचे मतदारसंघ पुन्हा एकद भाजपने जिंकले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला. वडगाव शेरीची जागा जिंकत महाविकास आघाडीनं आपलं अस्तित्व टिकवलं. मात्र, जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली आहे. तर कल्याणीनगर अपघात प्रकरणी चर्चेत आलेले राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. (Pune Assembly Elections 2024)
भाजपने कोथरूड (Kothrud), पर्वती (Parvati), शिवाजीनगर (Shivajinagar), पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासला, आणि कसबा पेठ या जागा लढवल्या आणि या सहा जागांवर विजय मिळवला. त्यात कोथरूडमधून चंद्रकांत पाटील मोठ्या मताधिक्यांने सलग दुसर्यांदा विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांचा तब्बल 1 लाख 11 हजार 545 इतक्या मतांनी पराभव केला. तर हडपसर मतदारसमघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार चेतन तुपे विजयी झाले आहेत.
पुण्यात महायुतीचे (Mahayuti) 7 उमेदवार विजयी तर आघाडीला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. पुणेकरांची पसंती महायुतीला असल्याचं चित्र यावरून दिसून येत आहे, भाजपचे 6 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) पक्षाकडून एक उमेदवार विजयी झाला आहे. (Pune Assembly Elections 2024)
विधानसभा निहाय निकाल
महायुती (Mahayuti)
कोथरूड
विजयी उमेदवार: चंद्रकांत पाटील
मतं: 1,59,234
पराभूत उमेदवार: चंद्रकांत मोकाटे
मतं:47,193
मताधिक्य: 1,12,041
शिवाजीनगर
विजयी उमेदवार: सिद्धार्थ शिरोळे
मतं: 84,695
पराभूत उमेदवार: दत्तात्रय बहिरट
मतं: 47,993
मताधिक्य: 36,702
पर्वती
विजयी उमेदवार: माधुरी मिसाळ
मतं: 1,18,193
पराभूत उमेदवार: अश्विनी कदम
मतं: 63,533
मताधिक्य: 54,660
खडकवासला
विजयी उमेदवार: भीमराव तापकीर
मतं: 1,63,131
पराभूत उमेदवार: सचिन दोडके
मतं: 1,10,809
मताधिक्य: 52,322
हडपसर
विजयी उमेदवार: चेतन तुपे
मतं: 1,34,810
पराभूत उमेदवार: प्रशांत जगताप
मतं: 1,27,688
मताधिक्य: 7,122
पुणे कँटोन्मेंट
विजयी उमेदवार: सुनील कांबळे
मतं: 76,032
पराभूत उमेदवार: 65,712
मताधिक्य: 10,320
कसबा
विजयी उमेदवार: हेमंत रासने
मतं: 90,046
पराभूत उमेदवार: रवींद्र धंगेकर
मतं: 70,623
मताधिक्य: 19,423
महा विकास आघाडी (Mahavikas Aghadi)
वडगाव शेरी
विजयी उमेदवार: बापूसाहेब पठारे
मतं: 1,33,689
पराभूत उमेदवार: सुनील टिंगरे
मतं: 1,28,979
मताधिक्य: 4710