एक्स्प्लोर

VIDEO: 1500 दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर 3000 वसुल करणार, कोल्हापुरात भाजप महिला नेत्याचं वक्तव्य

वादग्रस्त वक्तव्य केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 1500 दिलेत, महायुतीला (Mahayuti) मत दिले नाही तर 3000 वसुल करणार, असं वक्तव्य भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने केलं आहे.

Kolhapur News : विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. या काळात सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. या काळात राजकीय नेते विविध वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. असाच एक वादग्रस्त वक्तव्य केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 1500 दिलेत, महायुतीला (Mahayuti) मत दिले नाही तर 3000 वसुल करणार, असं वक्तव्य कोल्हापूर भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव (Megharani Jadhav) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याविरोधात राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळालं आहे. 

महायुती सरकारनं लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. ही योजना राज्यात लोकप्रिय ठरली आहे. मात्र, योजनेबाबत महायुतीचे काही नेते वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 1500 दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर 3000 वसुल करणार अस वक्तव्यं केलं आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील होत आहे.करवीर पन्हाळा गगनबावडा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ गारीवाडे इथं आयोजीत करण्यात आलेल्या सभेत भाजपच्या महिला पदाधिकारी मेघारानी जाधव बोलत होते. 

 

धनंजय महाडिक यांनी देखील केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

लाडकी बहिणी योजनेचे पंधराशे रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅली दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नावं लिहून घ्या. कारण घ्यायचं आपल्या शासनाचे आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही. अनेक ताया आहेत, महाराष्ट्रात छाती बडवत आहेत. आम्हाला पैसे नको आम्हाला सुरक्षा पाहिजे म्हणत आहेत", असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलं होतं. त्यानंतर आता भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

गगनबावडा, पन्हाळा आणि करवीर मतदारसंघात रंगतदार लढत

कोल्हापूरातील गगनबावडा, पन्हाळा आणि करवीर अशा तीन तालुक्यांचा हा करवीर विधानसभा मतदार संघ आहे. कोल्हापूरातील सर्वात मोठा मतदार संघ म्हणून हा मतदार संघ ओळखला जात आहे.साल 2019 मध्ये येथे कॉंग्रेसचे पी. एन.पाटील यांचा विजय झाला होता. मागच्या दोन निवडणूकात त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. यंदा स्वर्गीय पी.एन. पाटील यांचे पूत्र राहुल पाटील आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते चंद्रदीप नरके यांच्यात मुख्य लढत होणार आहे. लोकसभा निवडणूकीत याच मतदार संघातून शाहू महाराज यांना 70 हजाराचे लीड मिळाले होते. त्यामुळे या विधानसभा निवडणूकीत या मतदार संघात काय होणार याकडे लक्ष लागलेले आहे.

 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
Who is Ramrao Wadkute: राष्ट्रवादीतून विधान परिषदेची आमदारकी अन् आता भाजपकडून राज्यसभेवर संधी; मराठवाड्यातून संधी मिळालेले रामराव वडकुते आहेत तरी कोण?
राष्ट्रवादीतून विधान परिषदेची आमदारकी अन् आता भाजपकडून राज्यसभेवर संधी; मराठवाड्यातून संधी मिळालेले रामराव वडकुते आहेत तरी कोण?
Rajya Sabha Election 2026: मोठी बातमी : नुकतंच निवडून आलेल्या नगरसेविकेला भाजपने थेट राज्यसभेवर पाठवलं, कोण आहेत मायाताई इवनाते?
मोठी बातमी : नुकतंच निवडून आलेल्या नगरसेविकेला भाजपने थेट राज्यसभेवर पाठवलं, कोण आहेत मायाताई इवनाते?
Rajya Sabha Election 2026: भाजपचे 4 खासदार हमखास जिंकणार, राज्यसभा निवडणूक कशी होणार, समीकरण काय?
भाजपचे 4 खासदार हमखास जिंकणार, ठाकरेंचे किती? राज्यसभा निवडणुकीचं समीकरण काय?

व्हिडीओ

Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?
Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Gold Rate : युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
Who is Ali Larijani: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
अली लारीजानी: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
मुंबई विमानतळावर कस्टमची कारवाई, स्मग्लिंगचा माल पकडला, विदेशी चलन, सोनं, माणिक, ड्रग्स जप्त
मुंबई विमानतळावर कस्टमची कारवाई, स्मग्लिंगचा माल पकडला, विदेशी चलन, सोनं, माणिक, ड्रग्स जप्त
मोठी बातमी! शरद पवारच राज्यसभेचे उमदेवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा; काँग्रेस अन् ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा
मोठी बातमी! शरद पवारच राज्यसभेचे उमदेवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा; काँग्रेस अन् ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा
Embed widget