एक्स्प्लोर

Shivsena Eknath Shinde List : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी समोर, विद्यमान आमदारांना पुन्हा संधी, 45 नावं जाहीर

Eknath Shinde Shiv Sena Candidate List 2024 :

Eknath Shinde Shiv Sena Candidate List 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिदेंच्या नेतृत्वात लढली जाणारी ही पहिली निवडणूक असून आता शिवसेनेने आता 45 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रसिद्धी पत्रकारद्वारे ही पहिली यादी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा 99 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर अजित पवारांनी पुढचं पाऊल टाकतं 17 जणांना एबी फॉर्मचे वाटप केले होते. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी आता 45 उमेदवार जाहीर केले आहेत. शिदेंच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे. 

शिंदेंच्या पहिल्या यादीत मंत्री उदय सामंतांसह त्यांच्या भावाचाही समावेश 

शिंदेंच्या शिवसेनेच्या पहिल्या यादीत मंत्री उदय सामंत यांच्या नावाचा समावेश आहे. शिवाय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना राजापूरमधून उमेदवारीजाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरीमधून मंत्री उदय सामंत यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर  दापोलीमधून योगेश कदमांना तिकीट देम्यात आले आहे. मात्र गुहागर विधानसभा मतदारसंघाची जागा पहिल्या यादीत जाहीर करण्यात आलेले नाही.

शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवार यादी 

1. एकनाथ शिंदे - कोपरी पाचपाखाडी 
2. साक्री - मंजुळा गावीत
3. चोपडा - चंद्रकांत सोनवणे 
4. जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील 
5. पाचोरा - किशोर पाटील 
6. एरंडोल - अमोल पाटील 
7. मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील 
8. बुलढाणा - संजय गायकवाड 
9. मेहकर - संजय रायमुलकर 
10.दर्यापूर - अभिजीत अडसूळ 11. आशिष जयस्वाल - रामटेक 
12. भंडारा - नरेंद्र भोंडेकर 
13. दिग्रस - संजय राठोड 
14. नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर 
15.कळमनुरी - संतोष बांगर 
16. जालना - अर्जुन खोतकर 
17.सिल्लोड - अब्दुल सत्तार 
18.छ संभाजीनगर मध्य - प्रदीप जयस्वाल 
19. छ. संभाजीनगर पश्चिम - संजय सिरसाट 
20. पैठण - रमेश भूमरे 

21.वैजापूर - रमेश बोरनारे 
22.नांदगाव -  सुहास कांदे 
23. मालेगाव बाह्य - दादाजी भूसे 
24. ओवळा माजीवडा - प्रताप सरनाईक 
25. मागाठाणे - प्रकाश सुर्वे 
26. जोगेश्वरी पूर्व - मनीषा वायकर 
27. चांदिवली - दिलीप लांडे 
28. कुर्ला - मंगेश कुडाळकर
29. माहीम - सदा सरवणकर 
30. भायखळा - यामिनी जाधव 
31. कर्जत महेंद्र थोरवे

32. अलिबाग - महेंद्र दळवी 
33. महाड - भरत गोगावले 
34. उमरगा - ज्ञानराज चौगुले
35. सांगोला - शहाजीबापू पाटील 
36. कोरेगाव - महेश शिंदे 
37. परांडा - तानाजी सावंत 
38. पाटण - शंभूराज देसाई 
39. दापोली - योगेश कदम 
40. रत्नागिरी - उदय सामंत 
41. राजापूर - किरण सामंत 
42. सावंतवाडी - दीपक केसरकर 
43. राधानगरी - प्रकाश आबिटकर 
44. करवीर - चंद्रदीप नरके 
45. खानापूर - सुहास बाबर 

जळगाव जिल्ह्यात भाजपाप्रमाणेच, शिंदे गटात विद्यमान आमदार आणि त्यांच्या परिवारात  पुन्हा एकदा उमेदवारी दिल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने आज आपली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदार संघात अपेक्षे प्रमाणे मंत्री गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. दुसरीकडे पाचोरा मतदार संघात  किशोर पाटील यांना ही पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. या ठिकाणी भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी निवडणूक लढण्याची मोठी तयारी केली होती. या ठिकाणी मागच्या वेळीप्रमाणे भाजपाचे अमोल शिंदे पुन्हा एकदा बंडखोरी करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदार संघात मागील निवडणूक  वेळेस, रोहिणी खडसे यांच्या विरोधात अपक्ष निवडून आलेले आणि नंतर शिंदे गटात सहभागी झालेल्या चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.या ठिकाणी खडसे परिवाराचे सह भाजपाच्या इच्छुकांच्या नाराजीचे आव्हान चंद्रकांत  पाटील यांच्या पुढे राहणार आहे.कारण मुक्ताई नगर मतदारसंघात  भाजपाने आपल्या उमेदवाराचा दावा केला होता. दुसरीकडे एरंडोल पारोळा मतदार संघात चिमण आबा पाटील यांचे एवजी त्यांचे चिरंजीव अमोल पाटील यांना पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली आहे. वाढत्या वयाचा विचार करता,आपण आपल्या मुलाचे नाव,उमेदवार म्हणून  आपल्या एवजी पक्षाला दिले असल्याचे चिमण पाटील यांनी म्हटलं होतं. चोपडा मतदार संघात लता सोनावणे यांचे पती माजी  चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकंदरीतच जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये मागील वेळी असलेल्या आमदार आणि त्यांच्या परिवारातच  उमेदवारी देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

MNS Candidate List 2024 : राज ठाकरेंकडून दिवंगत रमेश वांजळेंच्या मुलाला तिकीट, चंद्रकांत पाटलांना काटे की टक्कर देणाऱ्याला संधी, मनसेचं रोहित पवारांविरोधातही तगडं प्लानिंग

Shivsena Eknath Shinde List : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी समोर, विद्यमान आमदारांना पुन्हा संधी, 45 नावं जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Jitendra Awhad Full PC : प्रतिभा पवारांची गेटवर अडवणूक प्रकरण, जितेंद्र आव्हाड अजितदादांवर कडाडलेSantosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांतRajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Embed widget