एक्स्प्लोर

ईव्हीएमविरोधात राज्यातील विरोधकांची जोरदार मोर्चेबांधणी, राज ठाकरेंसह महाआघाडीतील नेत्यांची आज पत्रकार परिषद

ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावर मनसेकडून आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील हे नेते उपस्थित राहणार आहेत.

मुंबई : वेगवेगळ्या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला गळती लागलेली आहे. कोणता आमदार कधी पक्षांतर करेल? अशी या पक्षांची सध्या अवस्था आहे. तर वंचित बहुजन आघाडी स्वबळाची तयारी करत आहे. या सर्व घडामोडी सुरु असताना दुसरीकडे राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीसह राज्यातील विरोधी पक्ष ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावर एकत्र येताना दिसत आहेत. ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावर मनसेकडून आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील हे नेते उपस्थित राहणार आहेत. येणारी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी यासाठी हे पक्ष एकत्र येत आहेत. या विरोधीपक्षांनी एकत्र येण्याचं निमित्त EVM असलं तरी विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र यायला सुरुवात झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी सध्या सर्व पक्षीय नेत्यांना भेटत आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतर पक्षांच्या जागा वाटपाची देखील चर्चा सुरू आहे. ह्या सगळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहेत. निम्मित आहे ईव्हीएम मशीनचं. लोकसभा निवडणुकीनंतर EVM ला वेगवेगळ्या माध्यमातून विरोध होत आहे. याबाबत नुकताच राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पतील, अजित पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला लागलेली गळती, भाजप आणि शिवसेना यांचे वाढत चाललेले सामर्थ्य पाहता विरोधीपक्षांना एकत्र येण्याशिवाय सध्यातरी पर्याय दिसत नाही. ईव्हीएम मशीनच्या निमित्ताने सुरुवात तर होत आहे पण विरोधी पक्षांची ही आघाडी विधानसभा निवडणुकीत टिकते का? किती लढा देते? हे वेळच ठरवेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरेDevendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्यDevendra Fadnavis On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंबाबत अजितदादांची अधिकृत भूमिका आहे : फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Beed Ajit Pawar: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
बीड डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
Embed widget