Shrigonda Assembly constituency : शेवटच्या क्षणी भाजपाने तिकीट दिलं, श्रीगोंद्यात थेट विजयाचा झेंडा रोवला, पाचपुते यांचा 'विक्रम' विजय!
Vikramsinh Pachpute Maharashtra Assembly Election 2024 : भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकांची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली.
Vikramsinh Pachpute Shrigonda Assembly Constituency 2024 : श्रीगोंदा मतदारसंघात भाजपने ऐनवेळी उमेदवारी बदलली होती, विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली होती. विद्यमान आमदार बबनराव पाचपुते आजारी असल्यामुळे त्यांच्या जागी पत्नी प्रतिभा पाचपुते यांना तिकीट देण्यात आले होते. पण नंतर भाजपने ऐनवेळी त्यांचा मुलगा विक्रमसिंह पाचपुते (Vikramsinh Pachpute) यांनी तिकिट दिले. तर महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार अनुराधा नागवडे यांना दिली. पण बबनराव पाचपुते यांचे पुत्र विक्रम पाचपुते यांचा 36 हजार 773 मतांनी विजय झाला.
याआधी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत श्रीगोंद्यामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला होता. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते 1,03,258 मतांनी विजयी झाले होते. तर राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम प्रतापराव शेलार यांना 4,750 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीचा सामना रंगला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राहुल जगताप 99,281 मतांनी विजयी झाले होते. तर भाजपचे बबनराव पाचपुते 13,637 मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा -