जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का, जिल्हाध्यक्ष भंगाळेंचा गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश
जळगावमध्ये (Jalgaon) शिवसेना उद्धव ठाकरे गटाला (Shiv Sena Thackeray Group) मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे (Vishnu Bhangale) यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय.
Jalgaon Politicis News : निवडणुकीच्या तोंडावर जळगावमध्ये (Jalgaon) शिवसेना उद्धव ठाकरे गटाला (Shiv Sena Thackeray Group) मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे (Vishnu Bhangale) यांनी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या प्रमुख उपस्थिती मधे शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे विष्णू भंगाळे यांच्या कार्यालयात जाऊन मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना प्रवेश दिला आहे.
उद्धव ठाकरे गटाला जळगावात मोठा धक्का
विष्णू भंगाळे यांच्या या प्रवेशाने शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जळगावात मोठा धक्का बसला आहे. महायुतीचे जळगाव शहराचे उमेदवार सुरेश भोळे यांना याचा फायदा होणार असल्याच मानले जात आहे. विष्णू भंगाळे यांचा पुन्हा एकदा मूळ शिवसेनेत प्रवेश ही संजय राऊत यांना चपराक असल्याचं मंत्री गुलाबराय पाटील यांनी म्हटलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटात आपण तन मन धनाने काम करून सुद्धा आपण काम करत नसल्याचा आरोप ते माझ्यावर करत असल्याने आपण हा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया
विष्णू भंगाळे यांनी दिली.
जळगाव शहर मतदारसंगात काँटे की टक्कर
जळगाव शहर मतदार संघात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. कारण भाजपाचे (BJP) विद्यमान आमदार सुरेश भोळे (Suresh Bhole) यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. भोळे यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाच्या (Mahavikas Aghadi) जयश्री महाजन (Jayashree Mahajan) लढणार आहेत. तर मनसेकडून डॉ. अनुज पाटील मैदानात उतरल्या आहेत. तर उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेनेचे कुलभूषण पाटील हे अपक्ष लढणार आहेत. या मतदारसंघातून सुरेश भोळे, जयश्री महाजन की कुलभूषण पाटील, मनसे डॉ. अनुज पाटील आहेर? कोण उधळणार विजयाचा गुलाल? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानं या मतदारसंघात महायुतीची ताकद वाढणार आहे. महायुतीकडून भाजपचे उमेदवार हे सुरेश भोळे आहेत. विष्णू भंगाळेंच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशाचा फायदा सुरेश भोळे यांना होणार आहे. त्यामुळं जळगाव शहरमध्ये सुरेश भोळे पुन्हा निवडून येणार असल्याची चर्चा यानिमित्ताने रंगू लागली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Jalgaon City Vidhan Sabha Constituency: जळगाव शहरात सुरेश भोळे गड राखणार की जयश्री महाजन? कोण उधळणार विजयाचा गुलाल?