एक्स्प्लोर

नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ | भाजप विजयाची सप्तपदी पूर्ण करणार?

नागपूर शहरातील इतर कोणत्याही विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत नागपूर पश्चिममध्ये नेहमीच इच्छुकांची गर्दी जास्त असते. त्याचे कारण म्हणजे इथल्या संमिश्र स्वरुपाचं जातीय, सामाजिक, भाषिक समीकरण. त्यामुळे हा मतदारसंघ सर्वच पक्षांना आणि उमेदवारांना वरवर का होईना सोपं वाटतो.

नागपूर : नागपुरात सर्वात आधी ज्या विधानसभा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलले तो मतदारसंघ म्हणजे नागपूर पश्चिम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या मतदारसंघातून विधानसभेत पाऊल ठेवलं तो मतदारसंघ म्हणजे नागपूर पश्चिम. मुख्यमंत्र्यांसह अनेक व्हीआयपी ज्या मतदारसंघात निवास करतात तो म्हणजे नागपूर पश्चिम. शहरातील इतर भागांच्या तुलनेत जास्त विकसित असलेला नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ भोगौलिकदृष्ट्याही तितकाच मोठा आहे. गेल्या दोन तीन दशकात मतदारसंघात विकासाची अनेक कामे झाल्यानंतरही अनेक नागरी समस्या कायम आहेत..
काय आहे नागपूर पश्चिम मतदारसंघाचा राजकीय इतिहास?  
कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पश्चिम मतदारसंघात 1990 मध्ये विनोद गुडधे पाटील यांनी पहिल्यांदा कमळ फुलवले. विशेष म्हणजे नागपुरात भाजपने जिंकलेली ही विधानसभेची पहिलीच जागा होती. त्यानंतर 1995 मध्ये सुद्धा विनोद गुडधे पाटील यांनी भाजपला यश मिळवून दिले. त्याच वर्षी राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर विनोद गुडधे पाटील राज्यमंत्री झाले. मात्र, नंतर भाजप नेत्यांशी मतभेद झाल्यामुळे विनोद गुडधे पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1999 मध्ये भाजपने नागपूर पश्चिमचा आपला किल्ला त्यावेळचे युवा महापौर देवेंद्र फडणवीस यांच्या हवाली केला आणि फडणवीस यांनी भाजपच्या या किल्ल्याला अजेय बनवत इथून 1999 आणि 2004 असे दोनदा सहजरित्या विजय खेचून आणला. 2009 मध्ये मतदारसंघाची फेररचना होऊन नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काही भाग काढून नागपूर दक्षिण-पश्चिम हा नवा मतदारसंघ तयार झाला. त्यामुळे 2009 च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिममधून निवडणूक लढले आणि विजयी झाले. तर भाजपने 2009मध्ये सुधाकर देशमुख यांना संधी दिली. सुधाकर देशमुख यांनीही  पक्षाच्या विश्वासाला सार्थ ठरवत सलग दोनदा म्हणजेच 2009 आणि 2014 मध्ये विधानसभा गाठली. 2009 मध्ये रिपाईकडून (आठवले गट) उमेदवार असलेल्या प्रकाश गजभिये यांनी काँग्रेसची जबरदस्त 'वोट कटिंग' केल्यामुळे भाजपच्या सुधाकर देशमुखांनी काँग्रेसच्या अनिस अहमद यांना काठावर म्हणजेच अवघ्या 1 हजार 980 मतांनी पराभूत केले. मात्र, 2014 मध्ये मोदी लाटेवर स्वार भाजपने काँग्रेसच्या अंतर्गत रुसव्या फुगव्यांचा पुरेपूर फायदा घेत तब्बल 26 हजार 402 मतांनी काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना पराभूत केले.
काय आहे नागपूर पश्चिममधील जातीय, भाषिक, सामाजिक आणि आर्थिक समीकरण? 
पश्चिम नागपूर हा शहरातील इतर भागांच्या तुलनेत विकसित भाग म्हणून ओळखला जातो. मात्र मतदारसंघाचे खरे चित्र पहायला मिळते ते अर्धविकसित आणि मागास वस्त्यांमध्ये. धरमपेठ, खरे टाऊन, शिवाजीनगर, रामदासपेठ, गांधी नगर, गोकुळपेठ, सिव्हिल लाईन्ससारखे काहीसे उच्च भ्रू आणि विकसित क्षेत्र आहेत. तर दुसऱ्या बाजूला मकरधोकडा, दाभा, गोरेवाडा, झिंगाबाई टाकळी, पांढराबोडी, फुटाळा, तेलंगखेडी सारखा अविकसित भागही याच मतदारसंघात येतो. जातीय समीकरणांचा विचार केल्यास नागपूर पश्चिम मतदारसंघात कुणबी समाजाचे मतदार सर्वाधिक आहेत. त्यानंतर उत्तर भारतीय मतदार ज्यात मध्य प्रदेशातील रिवा परिसरातील मतदारांची लक्षणीय संख्या नागपूर पश्चिम मतदारसंघात आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे मतदारही मोठ्या संख्येने असून मुस्लिम, ख्रिस्ती मतदारही आहेत. मराठी भाषिक आणि हिंदी भाषिक मतदार समसमान संख्येत असून गेल्या अनेक निवडणुकांमध्ये जातीय आणि सामाजिक समीकरणे लक्षात घेऊनच काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष इथे आपापले उमेदवार देत आले आहेत.
इच्छुकांची गर्दी
नागपूर शहरातील इतर कोणत्याही विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत नागपूर पश्चिममध्ये नेहमीच इच्छुकांची गर्दी जास्त असते. त्याचे कारण म्हणजे इथल्या संमिश्र स्वरुपाचं जातीय, सामाजिक, भाषिक समीकरण. त्यामुळे हा मतदारसंघ सर्वच पक्षांना आणि उमेदवारांना वरवर का होईना सोपं वाटतो. जरी गेल्या 10 वर्षांपासून भाजपचे सुधाकर देशमुख इथले आमदार असले तरी यावेळी भाजपमध्ये इच्छुकांची मोठी यादी आहे. सुधाकर देशमुख स्वतः विद्यमान आमदार असल्याने त्यांची निवडणूक लढण्याची इच्छा कायम आहे. तर पक्षाकडून उमेदवार बदलण्याचे संकेत मिळत असल्यामुळे बरेच भाजप नेते कंबर कसून तयार आहेत. महापौर नंदा जिचकार, अनुभवी नगरसेवक भूषण शिंगणे, जयप्रकाश गुप्ता, दयाशंकर तिवारी, नगरसेवक सुनील अग्रवाल हे आणि इतर अनेक जण रांगेत आहेत. यापैकी एकाही उमेदवारावर एकमत झालं नाही तर ऐनवेळी राज्यमंत्री परिणय फुके यांना कुणबी चेहरा म्हणून रिंगणात उतरवले जाऊ शकते. दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षात मागील निवडणुकीतील पराभूत उमेदवार आणि विद्यमान काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे हे काँग्रेसकडून उमेदवारी मागत आहेत. त्यांच्याशिवाय नरेंद्र जिचकार, नगरसेवक नितीश ग्वालबंशी, संदेश सिंगलकर असे युवा काँग्रेस नेते ही नागपूर पश्चिममधून इच्छुकांच्या रांगेत आहेत. मात्र, 2009 मध्ये थोड्या फरकाने पराभूत झालेले अनुभवी नेते अनिस अहमद यांच्या मनातली नागपूर पश्चिममधून विधानसभा गाठण्याची सुप्त इच्छा नव्याने जागी झाल्यास या सर्व युवा काँग्रेस नेत्यांचा खेळ बिघडू शकतो. 2014 मध्ये 15 हजार मते घेणाऱ्या बसपामध्ये या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमधील समीकरण प्रभावित करण्याची क्षमता आहे. सध्या तरी बसपामधून सुभाष सरोदे आणि अविनाश बडगे ही नावे चर्चेत आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण असेल हे अजून स्पष्ट नाही.
गेल्या काही निवडणुकांचे मतदान काय सांगते?
आपल्या संमिश्र स्वभावामुळे 1990 पर्यंत नागपूर पश्चिम मतदारसंघ काँग्रेससाठी सोपा होता. मात्र, 1990 मध्ये भाजपच्या उदयाने इथे काँग्रेसचा सूर्य मावळला. 1990 पासून 2014 पर्यंत सलग सहा वेळेला इथे भाजपने विजयाचा षटकार मारला आहे. त्यामुळे पुन्हा सातव्यांदा भाजप विजयी होते का असाच प्रश्न सर्वांच्या मनात आहे. गेल्या दोन विधानसभा आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या आकड्यांवर नजर टाकली तर इथे भाजपचा विजय 'जर तर' वरच जास्त अवलंबून असल्याचे लक्षात येते.
2009 - विधानसभा निवडणूक 
भाजप - 59,955
काँग्रेस - 57,976
रिपाई (आ.) - 21,864
(या निवडणुकीत रिपाइं(आ) च्या उमेदवाराने सुमारे 22 हजार मते घेत काँग्रेसला अवघ्या 1,980 मतांनी पराभूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
2014 - विधानसभा निवडणूक 
भाजप - 86,500
काँग्रेस - 60,098
बसपा - 14,196
(2014 च्या मोदी लाटेचा परिणाम आणि काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळवण्यावरुन विकास ठाकरे आणि राजेंद्र मूळक यांच्यात झालेली रस्सीखेच भाजप आपले मताधिक्य 26 हजार 402 पर्यंत वाढवण्यात यशस्वी ठरली होती हे विशेष)
2019 - लोकसभा निवडणूक 
2019च्या लोकसभा निवडणुकीत ही भाजप उमेदवार म्हणून नितीन गडकरी यांनी नागपूर पश्चिम मतदारसंघातून 27 हजार 252 मतांची आघाडी घेत भाजपचे 2014 च्या विधानसभा निवडणुकीचे मताधिक्य कायम ठेवले. मात्र, 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांचे मताधिक्य नागपूर पश्चिममध्ये काही अंशी घटले आहे. ही सुद्धा भाजपसाठी काहीशी चिंतेची बाब आहे.
मतदारसंघात महत्वाचे मुद्दे काय?
नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या मोठ्या भौगोलिक आकारासारख्याच इथल्या समस्याही मोठ्या आहेत. या मतदारसंघाच्या बाह्य भागात वसलेल्या वस्त्यांमध्ये सर्वच प्रकारच्या नागरी सुविधांची कमतरता आहे. खासकरुन कचरा, अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अशा अनेक समस्या या वस्त्यांमध्ये कायम आहेत. शिवाय शहरात असलेले दोन्ही मोठे सरकारी रुग्णालय या मतदारसंघातील अनेक वस्त्यांपासून बरेच लांब असल्याने इथल्या गरीब नागरिकांना आरोग्य सुविधांसाठी महागड्या खाजगी रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. पश्चिम नागपुरात 100 खाटांच्या मोठ्या सरकारी रुग्णालयाचे आश्वासन अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही. अनेक वस्त्या दाटीवाटीच्या असल्याने इथे पार्किंगची समस्या आहे. शिवाय अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांच्या अतिक्रमणामुळे आधीच अरुंद रस्ते आणखी अरुंद होऊन वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. गोरेवाडा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाची घोषणा अनेक वर्षांपूर्वी झाली होती. मात्र, त्यावर काम प्रत्यक्षपणे गेल्या पाच वर्षातच झाले असले तरी अद्याप ते पूर्ण झालेले नाही. त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय अस्तित्त्वात आल्यावर रोजगार निर्माण होतील ही लोकांची अपेक्षा अजून पूर्ण झालेली नाही. झोपडपट्ट्यातील रहिवाशांना ते राहत असलेल्या जागांचे पट्टे (ती जागा त्यांच्या नावावर करण्याची प्रक्रिया) दिले जातील अशी भाजपची घोषणा होती. त्यासंदर्भात सर्वेक्षणाचे काम झाले असले तरी अद्याप पट्टे वाटपाचे काम पूर्ण झालेले नाही. असे असले तरी या मतदारसंघात गेल्या पाच वर्षात सिमेंट रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. शिवाय सदर या अत्यंत दाटीवाटीच्या बाजारपेठेत फ्लायओव्हरचे काम जोरात सुरु आहे. झोपडपट्ट्यांमधील पट्टे वाटपासाठी 'प्लॅन टेबल सर्वेक्षणाचे' काम पूर्ण केल्या गेले आहे. दरम्यान, याच मतदारसंघात मोडणाऱ्या अनेक पोलीस स्टेशनच्या क्षेत्रात गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांची समस्या मोठी असून दिवसागणिक नागरिकांना त्याची झळ बसत आहे.
एकंदरीत काय तर 1990 पासून प्रत्येक निवडणुकीत नागपूर पश्चिममध्ये काँग्रेसकडून भाजपला कडवी झुंज मिळेल असेच चित्र निवडणुकीपूर्वी पाहायला मिळते. निवडणुकीनंतर मात्र सातत्याने भाजपचे कमळच इथे फुललेले दिसते. सलग सहा टर्म विजय मिळवत भाजपने एकप्रकारे विजयाचा षटकार आधीच मारला आहे. आता आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर आणि काँग्रेसमधील गटबाजीचा नेहमीच्या पद्धतीने फायदा उचलत भाजप इथे विजयाची सप्तपदी पूर्ण करते की काँग्रेस आपल्या कधीकाळच्या या बालेकिल्ल्यात यशस्वी पुनरागमन करते, हेच या निवडणुकीतले लाखमोलाचे प्रश्न आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोपSpecial Report Bangladeshi : मुंबईत नेमके किती बांगलादेशी? चालू वर्षात 177 बांगलादेशींना अटकTop 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget