एक्स्प्लोर

मोदी-शाहांना मदत होईल, अशाही कोणाला मतदान करु नका : राज ठाकरे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच सोलापूरमध्ये आज राज ठाकरेंनी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी आरक्षण, पुलवामा हल्ला, एअर स्ट्राईक, नोटाबंदी अशा विविध मुद्द्यांवरुन भाजपवर हल्लाबोल केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह या जोडगोळीवरही सडकून टीका केली.

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत शिवसेना तसंच वंचित बहुजन आघाडीला मत देऊ नका, असं अप्रत्यक्ष आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. सोलापुरातील जाहीर सभेत ते बोलत होते. नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांना मदत होईल, अशा कोणालाही मतदान करु नका, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच सोलापूरमध्ये आज राज ठाकरेंनी जाहीर सभा घेतली. सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि भाजपच्या जयसिद्धेश्वर स्वामी यांचं आव्हान आहे. या सभेत राज ठाकरेंनी आरक्षण, पुलवामा हल्ला, एअर स्ट्राईक, नोटाबंदी अशा विविध मुद्द्यांवरुन भाजपवर हल्लाबोल केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह या जोडगोळीवरही सडकून टीका केली. शिवसेनेला मत देऊ नका असं अप्रत्यक्ष सांगताना राज ठाकरे म्हणाले की, "नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या डोक्यात जे चालू आहे ते रशियाच्या लेव्हलवर घेऊन जायचंय. आठ दहा लोकांच्या हातात या देशाची सूत्र असणार, अर्थकारणापासून सगळ्या गोष्टी हे आठ दहा लोक बघणार. बाकी तुम्ही कोण गुलाम. तुम्हाला बोलायला स्वातंत्र्य नाही. संपूर्ण देशाची गळचेपी करुन टाकतील. तुम्हाला अन्यायाविरुद्ध बोलायचं असेल तर बोलू देणार नाही. अॅडॉल्फ हिटलरने जे जर्मनीमध्ये केलं तिथे घेऊन जायचंय यांना. या भारतातली लोकशाही मोडून काढायची आहे. या देशातल्या संस्था मोडून काढायच्या आहेत. यांचं सरळ चालू नाही. म्हणून मी आज एकही उमेदवार उभा न करता, निवडणूक न लढवता, तुमच्यासमोर आलोय तुम्हाला हे सांगायला की बाबांनो पुन्हा बळी पडू नका. नरेंद्र मोदी आणि अमित शाह या देशाच्या राजकीय क्षीतिजावरुन नाहीसे झाले पाहिजेत. या दोघांना नाहीच नाही, परंतु या दोघांना मदत होईल अशाही कोणाला मदतान करायचं नाही." राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • निवडणूक जिंकल्यानंतर सत्ताधारी तुमच्याशी खोटं बोलतात, कारण निवडणूक हा विषय आपण गांभीर्याने घेत नाही - राज ठाकरे
  • गेल्या ५ वर्षात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या - राज ठाकरे
  • आमच्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा ,तुम्ही किती खोटं बोललात ह्याचा हिशोब आधी करा. राज ठाकरेंना भाजपल टोला
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 वर्षांपूर्वी जी दाखवलेली स्वप्न आहेत त्याविषयी बोलत नाहीत - राज ठाकरे
  • पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांच्या जीवावर मतं मागत आहेत, ऐअरस्ट्राइकच्या जीवावर का मतं मागत आहेत - राज ठाकरे
  • मोदी म्हणाले होते की दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकऱ्या देऊ, मात्र नोकऱ्या दिल्याच नाहीत - राज ठाकरे
  • उलट नोटाबंदीमुळे देशात साडेचार ते पाच कोटी रोजगार गेले- राज ठाकरे
  • महाराष्ट्रातील नोकऱ्यांमध्ये जर स्थानिक लोकांना प्राधान्य दिलं तर आरक्षणाची गरजच नाही - राज ठाकरे
  • तरुण बेरोजगार आहेत आणि आपण जातीच्या चर्चांमध्ये अडकलोय - राज ठाकरे
  • जातीवरून मतं मिळवण्यासाठी आरक्षणाची आमिषं दाखवत आहेत- राज ठाकरे
  • 5 वर्ष झाली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काय झालं? - राज ठाकरे
  • बहुमत मिळूनही मोदी सरकार जनतेशी खोटं बोलतंय- राज ठाकरे
  • विकासाच्या मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठी जातीचा मुद्दा बाहेर काढला जातो- राज ठाकरे
  • सरकारने 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्याचा दावा खोटा- राज ठाकरे
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी शहीद जवानांच्या नावाने मतं मागत आहे- राज ठाकरे
  • पंतप्रधानांच्या मते देशाच्या जवानापेक्षा व्यापारी साहसी आहेत- राज ठाकरे
  • नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना आठ-दहा लोकांच्या हाती देशाती सत्ता द्यायची आहे- राज ठाकरे
  • हिटलरने जर्मनीत जे केलं, पंतप्रधानांना ते भारतात करायचं आहे- राज ठाकरे
  • नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना लोकशाही मोडीत काढायची आहे- राज ठाकरे
  • भाजपने देश लुटून खाल्ला आहे- राज ठाकरे
  • भाजपने पैसे वाटले तर घ्या, मात्र त्यांच्याकडे परत ढुकूंनही पाहू नका- राज ठाकरे
  • ज्यांच्यावर विश्वास दाखवला त्यांनी केसांनी गळा कापला- राज ठाकरे
  • उद्योगपतींच कर्ज माफ होतात, मात्र शेतकऱ्यांचे नाही- राज ठाकरे
  • मोदी, शाह पुन्हा सत्तेवर येणार नाहीत याची काळजी घ्या- राज ठाकरे
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
Embed widget