निवडणूक प्रचारासाठी 'ड्रीम गर्ल' थेट गव्हाच्या शेतात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
हेमा मालिनी यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी याठिकाणी जमली होती. हेमा मालिनी यांनी पुन्हा एकदा विजयासाठी जोरदार प्रचार सुरु केला आहे.
नवी दिल्ली : 'ड्रीम गर्ल' अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांना भाजपने मथुरा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमा मालिनी यांनी अनोख्या पद्धतीने आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. हेमा मालिनी रविवारी प्रचारासाठी मथुरातील गोवर्धन परिसरातील एका शेतात पोहोचल्या होत्या.
शेतात जाऊन हेमा मालिनी यांनी प्रथम शेतातील गहू कापण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली. त्यानंतर कापलेल्या गव्हाच्या पेंढ्याही हेमा मालिनी यांनी स्वत: उचलून बाजूला ठेवल्या. हेमा मालिनी यांच्या या अनोख्या प्रचाराची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. हेमा मालिनी यांचे हे शेतातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
Began my Lok Sabha campaign today with the Govardhan Kshetra where I had the opportunity to interact with women working in the fields. A few fotos for u of my first day of campaign pic.twitter.com/EH7vYm8Peu
— Hema Malini (@dreamgirlhema) March 31, 2019
यावेळी हेमा मालिनी यांनी शेतातील महिलांसोबत बातचित केली. हेमा मालिनी यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी याठिकाणी जमली होती. हेमा मालिनी यांच्यासारखी स्टार शेतात जाऊन काम करते, हे पाहायला खुप छान वाटतं.
मात्र असं चित्र केवळ निवडणुकीतच पाहायला मिळतं. त्यामुळे ही केवळ स्टटंबाजी असल्याची टीकाही अनेकजण करत आहेत. मात्र हेमा मालिनी यांनी पुन्हा एकदा विजयासाठी जोरदार प्रचार सुरु केला आहे.
व्हिडीओ : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची तोंडी परीक्षा | तोंडी परीक्षा