एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर, मावळमधून पार्थ पवार तर शिरुरमधून अमोल कोल्हे मैदानात

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. मावळमधून पार्थ पवार, शिरुरमधून अमोल कोल्हे, नाशिकमधून समीर भुजबळ, बीडमधून बजरंग सोनवणे, दिंडोरीमधून धनराज महाले यांची नावे जाहीर झाली आहेत.

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. या यादीत मावळमधून पार्थ पवार, शिरुरमधून अमोल कोल्हे, नाशिकमधून समीर भुजबळ, बीडमधून बजरंग सोनावणे, दिंडोरीमधून धनराज महाले यांची नावे जाहीर झाली आहेत. लोकसभेची आणखी काही उमेदवारांची यादी शिल्लक आहे. त्यामध्ये कॉंग्रेस पक्षासोबत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे एकत्रित नावे जाहीर केली जातील असेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. VIDEO | पार्थ पवार मावळमधून तर शिरुरमधून अमोल कोल्हेंना संधी | मुंबई | एबीपी माझा पवार साहेबांनी माढा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांशी सल्लामसलत करून माढासाठी नाव जाहीर केले जाईल असे सांगतानाच एक दोन दिवसात इतर नावांची यादीही जाहीर केली जाईल असे  जयंत पाटील यांनी सांगितले. एकूण पाचजणांची नावे दुसऱ्या यादीत जाहीर करण्यात आली आहेत. माढा आणि नगरच्या उमेदवारांची नावे मात्र अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. बीडमधून घोषित झालेल्या बजरंग सोनावणे यांच्या नावावरुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमरसिंह पंडित यांच्या नावाची चर्चा होती. काल लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर झाली होती.  ही पहिली यादी असून उर्वरित यादी उद्या आणि परवा घोषित करण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी काल सांगितले होते. त्यानुसार आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली.
 लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर, मावळमधून पार्थ पवार तर शिरुरमधून अमोल कोल्हे मैदानात
14 मार्च रोजी पत्रकार परिषदेत मावळ, माढा, अहमदनगर, बीड, गोंदिया येथील उमेदवारांची घोषणा  झालेली नव्हती. काही जागा काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अदलाबदली करण्याचे चालले आहे, त्यावर चर्चा सुरु असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले होते.
पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 10 आणि लक्षद्वीपमधील 1  अशा 11 नावांची घोषणा करण्यात आली आहे. तर हातकणंगले लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादीने बुलडाणा लोकसभेतून राजेंद्र शिंगणे यांच्या नावाची घोषणा केली आहे. या जागेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पहिल्यापासून आग्रही आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा देत हातकणंगलेची जागा राष्ट्रवादीने सोडली असली तरी स्वाभिमानी अजून 2 जागांसाठी आग्रही आहे. त्यामुळे यावर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी तोडगा कसा काढणार याकडे आता लक्ष लागून आहे. पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे आणि मतदारसंघ ईशान्य मुंबई  - संजय दीना पाटील बारामती - सुप्रिया सुळे बुलडाणा - राजेंद्र शिंगणे सातारा - छत्रपती उदयनराजे भोसले कोल्हापूर - धनंजय महाडिक जळगाव - गुलाबराव देवकर रायगड- सुनील तटकरे ठाणे - आनंद परांजपे परभणी -  राजेश विटेकर कल्याण - बाबाजी पाटील लक्षद्वीप - मोहम्मद फैजल हातकणंगले - स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा लोकसभा निवडणूक : काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 5 उमेदवार, नागपुरात गडकरी विरुद्ध पटोले लढत रंगणार लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादीही नुकतीच जाहीर झाली आहे. 21 उमेदवारांच्या या यादीत महाराष्ट्रातील पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाचीही घोषणा झाली. या दुसऱ्या यादीत उर्वरित सर्व 16 जागा या उत्तर प्रदेशातील आहेत. यामध्ये नाना पटोले यांना नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे नागपुरात नितीन गडकरी विरुद्ध पटोले अशी लढत रंगणार आहे. दरम्यान दुसऱ्या यादीतही प्रियांका गांधी यांचं नाव आलेलं नाही. काँग्रेसने महाराष्ट्रातील पाच जागांवरील उमेदवारांच्या यादीत नागपूरमधून नाना पटोले, सोलापूरमधून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, मुंबई उत्तर-मध्यमधून प्रिया दत्त, मुंबई दक्षिणमधून मिलिंद देवरा, गडचिरोली-चिमूर येथून डॉ. नामदेव उसेंडी यांना काल उमेदवारी जाहीर केली. लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर, मावळमधून पार्थ पवार तर शिरुरमधून अमोल कोल्हे मैदानात उत्तर प्रदेशातील असून यामध्ये नगिना येथून ओमवती देवी जटाव, मोरादाबाद येथून राज बब्बर, खेरीतून जाफर अली नक्वी, सितापूरमधून कैसर जहाँ, मिसरिख येथून मंजरी राही, मोहनलाल गंज येथून रामशंकर भार्गव, सुल्तानपूर येथून डॉ. संजय सिंह, प्रतापगढ येथून रत्ना सिंह, कानपूरमधून श्रीप्रकाश जैस्वाल, फतेहपूर येथून राकेश सचन, बहारिचमधून सावित्रीबाई फुले, संत कबीर नगर येथून परवेझ खान, बंसगाव येथून कुश सौरभ, लालगंजमधून पंकज मोहन सोनकर, मिर्झापूर येथून ललितेश त्रिपाठी आणि रॉबर्ट्सगंज येथून भगवती प्रसाद चौधरी या उमेदवारांची नावे काल जाहीर करण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने 7 मार्च रोजी पहिली यादी जाहीर केली होती.  यात 15 उमेदवारांच्या जागा जाहीर करण्यात आल्या होत्या.  पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशमधील अमेठीतून तर सोनिया गांधी या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. VIDEO : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी अमेठीतून तर सोनिया गांधी रायबरेलीतून लढणार पहिल्या यादीत काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेल्या 15 जागांपैकी 11 जागा उत्तर प्रदेशातील तर चार जागा गुजरातमधील होत्या. सलमान खुर्शीद हे फरुखाबादमधून नशीब आजमावणार आहेत. लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर, मावळमधून पार्थ पवार तर शिरुरमधून अमोल कोल्हे मैदानात राहुल गांधी अमेठीतून, सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघातून लढणार असल्याची घोषणा झाली असली तरी प्रियांका गांधी यांचं नाव तूर्तास यादीत आलेलं नाही. प्रियांका गांधी यांच्या प्रवेशानंतर सोनिया लोकसभा लढणार की नाही याबद्दल साशंकता होती, मात्र त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget