Uddhav Thackeray Shiv Sena UBT Candidate Results : कुठं विक्रमी मताधिक्य तर कुठं निसटता पराभव; शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचा निकाल काय? पाहा एका क्लिकवर...
Shiv Sena UBT Candidate Results 2024 :उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेने 21 जागांवर उमेदवार उभे केले. राज्यात महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक उमेदवार हे ठाकरे गटांचे आहेत.
Shiv Sena UBT Candidate Results 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे नवे नाव आणि चिन्हासह मैदानात उतरलेल्या उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांनी चांगली कामगिरी केल्याचे चित्र आहे. मुंबईवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकहाती वर्चस्व कायम ठेवताना लढवलेल्या चारही जागांवर विजय मिळवला. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांनी तीन लाखांच्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला.
पक्षफुटीनंतर नव्याने राजकीय प्रवासाची सुरुवात करणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेने 21 जागांवर उमेदवार उभे केले होते. राज्यात महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) सर्वाधिक उमेदवार हे ठाकरे गटांचे आहेत. त्यामुळे ठाकरे गटांच्या उमेदवारांच्या कामगिरीवर सगळ्यांचे लक्ष लागले होते. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट हे एकमेकांविरोधात 13 मतदारसंघात उभे आहेत. त्यामुळे या मतदारसंघात कोणाचा विजय होणार, याकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी नव्याने पक्ष बांधणी केली. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले राज्यातील 18 खासदारांपैकी 13 खासदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत शिंदे गटात प्रवेश केला.
शिवसेना ठाकरे गटाच्या 21 उमेदवारांचा निकाल काय?
लोकसभा मतदारसंघ | उमेदवाराचे नाव | निवडणूक निकाल |
बुलढाणा | नरेंद्र खेडेकर | पराभव |
यवतमाळ वाशिम | संजय देशमुख | विजयी |
मावळ | संजोग वाघेरे पाटील | पराभूत |
सांगली | चंद्रहार पाटील | पराभूत |
हातकणंगले | सत्यजित पाटील | पराभूत |
हिंगोली | नागेश पाटील आष्टीकर | विजयी |
छत्रपती संभाजीनगर | चंद्रकांत खैरे | पराभूत |
धाराशिव | ओमराजे निंबाळकर | विजयी |
शिर्डी | भाऊसाहेब वाघचौरे | विजयी |
नाशिक | राजाभाई वाजे | विजयी |
रायगड | अनंत गीते | पराभूत |
सिंधुदुर्ग रत्नागिरी | विनायक राऊत | पराभूत |
ठाणे | राजन विचारे | पराभूत |
मुंबई ईशान्य | संजय दिना पाटील | विजयी |
मुंबई दक्षिण | अरविंद सावंत | विजयी |
मुंबई वायव्य | अमोल कीर्तिकर | पराभूत |
परभणी | संजय जाधव | विजयी |
मुंबई दक्षिण मध्य | अनिल देसाई | विजयी |
वैशाली दरेकर | कल्याण | पराभूत |
करण पवार | जळगाव | पराभूत |
भारती कामडी | पालघर | पराभूत |