वडील बिडील असली फिलिंग नाही, मी प्रचारावेळी राजधर्मच पाळणार, गजाभाऊंनी बापलेकांचं नातं बाजूला ठेवलं
अमोल माझा मुलगा असल्याने मी त्याच्या विरोधात लढणार नाही हे मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट केले होते. मुलगा जरी असला तरी महायुतीच्या उमेदवारासाठी काम करेल असा ठाम विश्वासही गजानन किर्तीकरांनी व्यक्त केला आहे.
![वडील बिडील असली फिलिंग नाही, मी प्रचारावेळी राजधर्मच पाळणार, गजाभाऊंनी बापलेकांचं नातं बाजूला ठेवलं Lok Sabha Election 2024 Gajanan Kirtikar on Amol Kirtikar North West Constitution Political marathi News वडील बिडील असली फिलिंग नाही, मी प्रचारावेळी राजधर्मच पाळणार, गजाभाऊंनी बापलेकांचं नातं बाजूला ठेवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/29/4a7e97baa7aab0c6679e0a17fc44fb53171437992687889_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : सध्या मुंबईत (Mumbai) सर्व पक्षांचा प्रचार जोरदार सुरु आहे. याचसंदर्भात शिवसेना नेते गजानन किर्तीकरांच्या (Gajanan Kirtikar) उमेदवारीचीही मध्यंतरी चर्चा होती. याचसंदर्भात बोलताना गजानन किर्तीकरांनी याला दुजोरा दिलाय. अमोल माझा मुलगा असल्याने मी त्याच्या विरोधात लढणार नाही हे मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट केले होते. मुलगा जरी असला तरी महायुतीच्या उमेदवारासाठी काम करेल असा ठाम विश्वासही गजानन किर्तीकरांनी व्यक्त केला आहे.
गजानन किर्तीकर म्हणाले, महायुतीचा नेता म्हणून मी इथे आलोय आम्हाला विश्वास आहे राहल शेवाळे नक्की विजयी होतील. उत्तर पश्चिममध्ये उद्धव ठाकरेंनी अमोलची उमेदवारी जाहीर केली आहे. मी विद्यमान खासदार आहे. मी विचार केला मी मुलाच्या विरोधात लढणार नाही. समाजात चुकीचा संदेश जाईल. इतके वर्ष राजकरणात असलेला बाप मुलाच्या विरोधतात लढतोय, अशी चर्चा झाली असती. मला ती प्रतिमा डागाळू द्यायची नव्हती. त्यासंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना स्पष्ट सांगितले होते. अमोल लढणाार असेल तर मी त्याच्या विरोधात लढणार नाही.
वडील बिडील असली काही फिलिंग नाही
मी शिवसेना नेता म्हणून एकनाथ शिंदेंकडे 13 खासदार आले. राहुल शेवाळेंचा अर्ज भरण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. वडील आणि राजकारण वेगळे करुन चालत नाही. माझा राजधर्म आहे. अमोलच्या विरोधात मी आमच्या उमेदवाराचा प्रचार करायला जाणार आहे. उमेदवार लवकर जाहीर होईल. वडील बिडील असली काही फिलिंग नाही, अशी दुहेरी भुमिका घेऊन चालत नाही.
वडिल शिंदे गटात तर पोरगा ठाकरे गटात
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर पक्षात दोन गट पडले आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात एक शिवसेना आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दुसरी शिवसेना आहे. दरम्यान, सेनेचे नेते गजानन किर्तीकर शिंदेंनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत गेले तर त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर ठाकरे गटात आहेत. शिवाय अमोल किर्तीकरांना ठाकरे गटाने लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे अमोल किर्तीकर यांच्या वडिलांवर म्हणजेच गजानन किर्तीकर यांच्यावर मुलाविरोधात प्रचार करण्याची वेळ येऊ शकते.
हे ही वाचा:
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकीय चिखलात फुटीर घराण्यांचा सुळसुळाट, पोरगा एका पक्षात तर वडिल दुसर्याच पक्षात, नवरा एका पक्षात तर बायको तिसऱ्या पक्षात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)