एक्स्प्लोर

KDMC : भाजप आणि शिंदेंकडून संपर्क, सन्मानजनक प्रस्ताव आल्यास विचार करू; ठाकरेचे नगरसेवक मोठा निर्णय घेणार

KDMC Election: मनसेने या आधीच शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर शिवसेनेच्या सात नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. शिंदे आणि भाजपकडून ठाकरेंच्या नगरसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत असून ठाकरेंचे सात नगरसेवक आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणताही सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आम्ही त्यावर विचार करु असं मोठं वक्तव्य ठाकरेंच्या नगरसेवकांनी केलं. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर या नगरसेवकांनी हे वक्तव्य केलं आहे. 

मनसेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाला मनसेच्या पाच नगरसेवकांनी पाठिंबा दिला. तसेच ठाकरेंच्या चार नगरसेवकांनीही शिंदेंना पाठिंबा दिला. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या कल्याण डोंबिवलीमधील नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली.  कल्याण महापालिकेतील घडामोडींवर त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली.

सन्मानजनक प्रस्तावावर विचार 

भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडून कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांना संपर्क करण्यात येत आहे. सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास आम्ही याबाबत विचार करू असं वक्तव्य ठाकरेंचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी केलं.

कल्याण डोंबिवली महाालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने मनसेसोबत युती करून निवडणूक लढवली. त्यामध्ये त्यांचे 11 आणि मनसेचे 5 नगरसेवक निवडून आले. परंतु, शिवसेना शिंदे गटाने ठाकरेंचे चार नगरसेवक गळाला लावल्याने ठाकरेंकडे सात नगरसेवक शिल्लक राहिले. या सात नगरसेवकांनी त्यांच्या गटाची नोंदणी केली आणि उमेश बोरगावकरांना गटनेता म्हणून घोषित केलं.

अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार

शिवसेनेच्या सात नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांनी कल्याण डोंबिवलीमधील घडामोडींची माहिती दिली. शिंदे गट आणि भाजपकडून आपल्याशी संपर्क केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी तसा काही प्रस्ताव आल्यानंतर काय करायचं याचं मार्गदर्शन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतलं. भाजप किंवा शिंदेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेला काही प्रस्ताव आल्यास त्यावर अंतिम निर्णय हा उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती आहे. 

मनसेचा शिंदेंना पाठिंबा 

दुसरीकडे, उद्धव ठाकरेंसोबत एकत्र लढलेल्या मनसेने मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. मनसेचे पाच नगरसेवक असून त्यांनी शिंदेना पाठिंबा दिला. लोकांची कामं करायची असतील, मतदारांनी दाखवलेला विश्वास कामाच्या स्वरुपात सार्थ करायचा असेल तर सत्तेला चिकटल्याशिवाय पर्याय नाही असं वक्तव्य मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केलं. 

ही बातमी वाचा:

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget