एक्स्प्लोर

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका

Local Body Election: एसआयआरची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात अशा सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक राज्यांना केल्या आहेत.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) पुढल्या वर्षीच होण्याची शक्यता वर्तवली आहे. एसआयआरची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या अशी केंद्रीय आयोगाची भूमिका आहे. 20 जिल्हा परिषदा आणि 291 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. एसआयआरची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात अशा सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक राज्यांना केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी होण्याची शक्यता आहे. 20 जिल्हा परिषदा आणि 291 पंचायत समित्या या निवडणुका यंदाच्या डिसेंबर किंवा पुढील वर्षाच्या जानेवारी 2027 आधी होण्याची शक्यता कमी आहे. शिवाय 105 नगरपंचायतीच्या निवडणुका फेब्रुवारी 2027 मध्ये संपणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) एकत्रित होण्याची शक्यता आहे. तर 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या 20 जिल्हा परिषद आणि त्यांच्या अंतर्गत पंचायत समितीच्या निवडणुकांचे सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती अवलंबून आहेत.(Local Body Election) 

राज्यातील मुदत संपलेल्या 20 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 211 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या डिसेंबर किंवा जानेवारी 2027 पूर्वी होण्याची शक्यता धूसर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या एका ताज्या निर्णयामुळे पुढील पाच ते सहा महिने तरी या निवडणुका होण्याची चिन्हे नाहीत. दुसरीकडे, राज्यातील 105 नगरपंचायतींची मुदत फेब्रुवारी 2027 मध्ये समाप्त होत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र घेण्याचा विचार केल्यास, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया फेब्रुवारी 2027 मध्येच पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या राज्यभरात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (SIR) मोहीम वेगाने सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाईल.

Local Body Election: केंद्रीय निवडणूक आयोगाचे काय आहेत निर्देश?

केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्य निवडणूक आयोगांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, एसआयआर (SIR) मोहीम पूर्णपणे पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत. या निर्देशानुसार, ऑक्टोबर महिन्यात प्रसिद्ध होणाऱ्या मतदार याद्या या केवळ विधानसभा मतदारसंघनिहाय असणार आहेत. त्यानंतर 20 जिल्हा परिषदा आणि 211 पंचायत समित्यांनुसार या याद्यांची प्रभागनिहाय विभागणी करावी लागेल. या प्रक्रियेवर नागरिकांच्या हरकती व सूचना मागवाव्या लागत असल्याने हे काम पूर्ण होण्यासाठी नोव्हेंबर अखेर उजाडेल. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतरच, म्हणजेच डिसेंबर महिन्यात राज्य निवडणूक आयोग प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करू शकेल.

 

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
CJP Protest: दिल्लीतील आंदोलनात 'तो' नक्षलवादी काय करत होता? अभिजीत दिपके जबाबदारी घेणार का? जनसंघर्ष समितीची प्रश्नांची सरबत्ती
दिल्लीतील आंदोलनात 'तो' नक्षलवादी काय करत होता? अभिजीत दिपके जबाबदारी घेणार का? जनसंघर्ष समितीची प्रश्नांची सरबत्ती
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Advertisement

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget