एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कन्हैय्या कुमार बेगूसरायमधून लढवणार निवडणूक, सीपीआयकडून उमेदवारी जाहीर
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार यांना बिहारच्या बेगूसरायमधून उमेदवारी घोषित केली आहे.
![कन्हैय्या कुमार बेगूसरायमधून लढवणार निवडणूक, सीपीआयकडून उमेदवारी जाहीर Kanhaiya Kumar contest in Begusaray with CPI Candidature कन्हैय्या कुमार बेगूसरायमधून लढवणार निवडणूक, सीपीआयकडून उमेदवारी जाहीर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/22225920/kanhaiya_kumar_3356007_835x547-m.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पाटना : कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार यांना बिहारच्या बेगूसरायमधून उमेदवारी घोषित केली आहे. बिहारमध्ये महाआघाडीने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र यात सीपीआयला एकही जागा देण्यात आली नाही. त्यानंतर सीपीआयने कन्हैय्या कुमार यांची उमेदवारी घोषित केली आहे.
बेगूसराय हा कन्हेय्या कुमार यांचा मतदारसंघ आहे. मागील काही दिवसांपासून कन्हैय्या कुमार येथुन निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा होत्या. आज त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला आहे. एनडीएकडून भाजपचे खासदार गिरीराज सिंह यांना बेगूसरायमधून उमेदवारी मिळू शकते. त्यांच्या नावाची सध्या चर्चा सुरु आहे. कन्हैय्या आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात कधी करणार? अशे अनेकदा त्यांना प्रश्न विचारले जात होते. अखेर त्यांनी निवडणुकीच्या मैदानात येण्याचा निर्णय घेतला आहे.
महाआघाडीने आज बिहारमधील उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाच्या 20 जागांपैकी एक जागा सीपीआयला (एमएल) देणार आहे. सीपीआय (एमएल)कडून राजू यादव यांना उमेदवारी मिळू शकते. सीपीआयला महाआघाडीत जागा न दिल्याने सरचिटणीस सुधाकर रेड्डी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कन्हैय्या कुमार बिहारमधील बेगूसराय जिल्ह्यातील बरौनी प्रखंड अंतर्गत बिहट पंचायत क्षेत्रातील रहिवासी आहे. त्यांची आई अंगणवाडी सेविका, तर वडील शेतकरी आहेत. एकेकाळी डाव्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बेगूसरायमध्ये सध्या भाजपचे वरिष्ठ नेते भोला सिंह खासदार आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर आरजेडीचे उमेदवार तनवीर हसन दुसऱ्या आणि सीपीआयचे राजेंद्र प्रसाद सिंह जेडीयूच्या समर्थनाने तिसऱ्या क्रमांकावर होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)