एक्स्प्लोर

India TV-CNX Poll Survey: 'या' 4 राज्यांमधून विरोधकांची आघाडी INDIA चा सुपडा साफ; हादरवणारा सर्वेक्षणाचा निष्कर्ष

Lok Sabha Election 2024 Survey: मणिपूर वगळता ईशान्येकडील 9 लोकसभेच्या जागांवरही हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं, त्यापैकी भारताला एकही जागा जिंकता आलेली नाही.

Lok Sabha Election 2024 Survey: भाजपच्या (BJP) नेतृत्वात एनडीए (NDA) आणि विरोधकांची आघाडी इंडियानं (INDIA) आगामी लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Elections) तयारी सुरू केली आहे. त्यामुळे राजकीय हालचालीही वाढू लागल्या आहेत. निवडणुकीला वर्षभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशातच, एका सर्वेक्षणाचे निष्कर्ष समोर आले आहेत. सर्वेक्षणातून समोर आलेली धक्कादायक आकडेवारीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

इंडिया टीव्ही-सीएनएक्स पॉल (India TV CNX Survey News) यांनी देशभरातील 543 लोकसभा जागांवर हे सर्वेक्षण केलं आणि लोकांना त्यांचे मत विचारले. सर्वेक्षणातून समोर आलेली आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे. आकडेवारीनुसार, चार राज्ये अशी आहेत जिथे विरोधी आघाडी इंडियाला एकही जागा मिळणार नाही. तसेच, हे सर्वेक्षण मणिपूर वगळता ईशान्येकडील 9 लोकसभेच्या जागांवर करण्यात आलं होतं, त्यापैकी इंडियाला एकही जागा जिंकता आलेली नाही.

गुजरात (Gujarat)

गुजरातमधील लोकसभेच्या 26 जागांवर केलेल्या या सर्वेक्षणात इंडिया एकही जागा जिंकणार नाही, असं म्हटलं होतं. त्याचबरोबर एनडीएला सर्व 26 जागा जिंकण्यात यश मिळाल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.  

गुजरात : 26 जागा
एनडीए (NDA) : 26
INDIA : 0

आंध्रप्रदेश (Andhra Pradesh)

आंध्र प्रदेशात लोकसभेच्या 25 जागा आहेत, ज्यात इंडियाला एकही जागा मिळणार नसल्याचं सर्वेक्षणात दिसून आलं आहे. त्याचबरोबर राज्यात एनडीएच्या वाट्याला एकही जागा जाणार नाही, सर्व 26 जागांवर इतर पक्ष विजय होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

आंध्रप्रदेश : 25 जागा
एनडीए (NDA) : 0
INDIA : 0
इतर : 25

उत्तराखंड (Uttarakhand)

सर्वेक्षणानुसार, उत्तराखंडमधील लोकसभेच्या 5 जागांपैकी इंडियाला एकही जागा जिंकता येणार नाही, तर एनडीए सर्व जागा जिंकू शकेल.

उत्तराखंड : 5 जागा
एनडीए (NDA) : 5
INDIA : 0

गोवा (GOA)

सर्वेक्षणानुसार, गोव्यातही इंडियाची स्थिती तशीच आहे, इथेही विरोधी आघाडीला एकही जागा मिळण्याची शक्यता नाही. त्याचबरोबर राज्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा एनडीए जिंकू शकतात.

गोवा : 2 जागा
एनडीए (NDA) : 2
INDIA : 0

ईशान्येकडील राज्य

मणिपूर (Manipur) वगळता ईशान्येकडील राज्यांतील 9 लोकसभेच्या जागांवर केलेल्या सर्वेक्षणानुसार, इंडियाला एकही जागा जिंकण्याची अपेक्षा नाही. मात्र, या सर्व 9 जागा एनडीएकडे जाऊ शकतात.

मणिपूर वगळता ईशान्येकडील राज्य : 9 जागा
एनडीए (NDA) : 9
INDIA : 0

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

India TV CNX Survey: सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होऊन मोदी नेहरुंची बरोबरी करणार? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah on Dr Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत अमित शाह नेमकं काय बोलले? UNCUTRohit Patil VidhanSabha Speech: द्राक्षांचा प्रश्न..भलेभले चाट पडतील असं रोहित पाटलांचं अभ्यासू भाषणMaharashtra Superfast News 18 December 2024 ABP MajhaMaratha Supporters Gunratn Sadavarte :तुळजापुरात गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Sara Tendulkar : अन् समुद्र किनाऱ्यावर दुसरा कॅच सारा तेंडुलकरनं पकडलाच! साराच्या अदांची अन् कॅचची सोशल मीडियात हवा!
Video : अन् समुद्र किनाऱ्यावर दुसरा कॅच सारा तेंडुलकरनं पकडलाच! साराच्या अदांची अन् कॅचची सोशल मीडियात हवा!
Uddhav Thackeray: राक्षसी बहुमत मिळाल्यामुळे भाजपकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान, मस्ती उतरवण्याची वेळ आलेय: उद्धव ठाकरे
अमित शाहांकडून आंबेडकरांचा तुच्छतेने उल्लेख, महाराष्ट्राच्या दैवतांना संपवण्याचा प्रयत्न: उद्धव ठाकरे
Embed widget