एक्स्प्लोर
Advertisement
लग्नानंतर धर्म बदलला नाही, माझा नवरा मुस्लीम आहे आणि मी हिंदू : उर्मिला मातोंडकर
नुकतीच काँग्रेसवासी झालेली बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने तिला तिच्या धर्मावरुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
मुंबई : नुकतीच काँग्रेसवासी झालेली बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने तिला तिच्या धर्मावरुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. उर्मिला म्हणाली की, "माझा नवरा जरी मुस्लीम असला तरी लग्नानंतर मी धर्म बदललेला नाही, मी हिंदूच आहे." उर्मिला मातोंडकर हिला काँग्रेसने उत्तर मुंबईतून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. तिने प्रचाराला सुरुवात केल्यानंतर काही लोकांनी तिचा नवरा मुस्लीम असल्यामुळे तिने धर्म बदलला आसल्याच्या अफवा पसरवणे सुरु केले आहे. यावर उत्तर देताना उर्मिलाने लग्नानंतर धर्म बदलला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
उर्मिला म्हणाली की, "माझा नवरा मुस्लीम आहे, तितकीच मी एक गौरवशाली हिंदू आहे. मी कधीही धर्म नाही बदलला. हिच आपल्या देशाची सुंदरता आहे. मला ट्रोल करणारे लोक इस्लामला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत." इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने धर्म बदलला नसल्याचे सांगितले.
उर्मिला ट्रोलर्सना उत्तर देताना म्हणाली की, "माझे विरोधक पाच वर्षात केलेल्या विकासकामांबद्दल बोलत नाहीत. विकासावर बोलण्याऐवजी हे लोक मला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. या लोकांना वाटतं की एक ग्लॅमर डॉल राजकारणात आली आहे. मी त्यांच्याविषयी बोलण्यापेक्षा माझ्या कामाद्वारे उत्तरं देईन."
काश्मीरमधील व्यावसायिक आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीरसोबत तीन वर्षांपूर्वी उर्मिलाने लगीनगाठ बांधली. मोहसिन हा उर्मिलापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धाराशिव
परभणी
क्राईम
भारत
Advertisement